१७-६-१९३८ राजकारणातील आपली प्रगती ब्रह्मदेवही थांबवू शकणार नाही - Page 207

राजकारणातील आपली प्रगती . . . . . शकणार नाही १६९

तुम्ही त्यावेळी केला नाही. ज्याचे पोट उपाशी मरते, मारवाडी देईल ते खाईल,

अशी ज्यांची स्थिती आहे त्या तुम्ही दाखविलेला प्रभाव प्रशंसनीय आहे. तुम्ही आम्ही खेड्यापाड्यांमध्ये विखरून राहिलेलो आहोत. आपली खेड्यात ` फ़क्त ५-२५ घरे, इतरांची १०० च्या वरती घरे आहेत. ' अमुक एक करा नाहीतर तुमची वस्ती हाकलून देऊ ' असे जर त्यांनी ठरविले तर ते सहज

करू शकतील, अशी तुमची स्थिती होती.

आपल्या माणसांनी स्वतंत्र मजूर पक्ष बलवान केला पाहिजे. त्यांच्या सांगण्याच्या विरुद्ध काहीही जाता कामा नये. त्यात समाजाच्या हिताच्या दृष्टीने तुमचाच फायदा आहे. मला सांगण्यास आनंद वाटतो की काँग्रेसचे

अध्वर्यू श्री. वल्लभभाई पटेल यांनी आपल्या शिस्तीचे असे वर्णन केले

आहे. ' संघटना असावी तर डॉ. आंबेडकरांच्या संघटनेसारखी ! ' (टाळया) तुम्ही

या संघटनेमध्ये बिघाड होऊ देऊ नका. हंडाभर दूध नुसत्या मिठाच्या खड्याने

नासते. पुष्कळसे अमृत विषाच्या नुसत्या थेंबाने बिघडते. त्याचप्रमाणे स्वार्थी,

दुर्गुणी लोक आपला स्वार्थ साधण्यासाठी प्रवृत्त असतात. त्यांची स्वार्थाकडे

विचारसरणी असते. अशी माणसे निर्माण होतील, हाच काळ कायम राहील,

असे वाटत नाही. धान्य निवडताना खडा आपण फेकून टाकतो त्याप्रमाणे

कंटक-स्वार्थी माणसाला खड्यासारखे निवडून टाकले पाहिजे. (टाळया) महार

जातीत तरी कोणताही मनुष्य स्वतंत्र मजूर पक्षाच्या विरूद्ध निर्माण होऊ

नये. राजकारणात संघटना व संघशक्ती केल्याखेरीज काही एक साधता

यावयाचे नाही. संघ शक्ती निर्माण करण्याकरिता पेसा पाहिजे. घरामध्ये

संसाराला पैसा लागतो. मीठ, मिरचीसाठी पैसा लागतो. पैशाशिवाय काही

चालत नाही. त्याप्रमाणे सार्वजनिक कार्याला पैसा लागतो. काँग्रेसजवळ

राजकारण खेळण्यासाठी पैसा आहे. मला असे कळले की नुकत्याच झालेल्या

डिस्ट्रीक्ट लोकल इलेक्शनमध्ये एका काँग्रेसच्या उमेदवाराने ३००० रू. खर्च

करुन यश मिळविले. पैशाशिवाय राजकारणाचा गाडा हाकता येत

नाही. दुसऱ्याच्या अंकित न राहता स्वतःच्या पायावर आयण उभे राहण्यास शिकले पाहिजे. यावेळी मी आपणाला महाभारतातील एका गोष्टीची आठवण ,

देतो. भीष्म आणि द्रोण कौरवांच्या बाजूला होते. कौरवांची बाजू खोटी व

पांडवांची बाजू खरी, असे त्यांना माहीत होते. ' राज्यच काय पण सुईच्या

अग्रावर मावेल इतकी मातीही पण मिळणार नाही ' असे कौरवांनी पांडवांना

सांगितले होते. खरी खोटी बाजू न जाणता भीष्म आणि द्रोण कौरवांच्या

बाजूने लढले. सत्याने युक्त अशा पांडवांच्या बाजूने का लढले नाहीत, असे

विचारले असताना ' आम्ही कौरवांचे अन्न खातो ' म्हणून सांगितले.