जो दुसन्यावरी विश्वासला त्याचा कार्यभाग बुडाला १७३
आहे. इततके बोलून मी भाषण संपवितो. '' नंतर श्री. डी. एस. मागाडे यांनी भाषण केले. त्यांनी आपल्या भाषणात सन १९२७ पासूनची एकंदर परिस्थिती निवेदन केली. नंतर श्री. एस. के. सोनवणे, बी. ए. ऑनर्स व श्री. डी. जी. जाधव यांचे भाषण झाल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाषण करण्यास उठले. टाळ्यांचा एकच कडकडाट झाला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाषणातील सारांश, '' आज मला भाषण करण्याची पाळी येईल अशी माझी कल्पना नव्हती. आपण पुष्कळ लोक जमले असल्यामुळे दोन शब्द बोलतो. आपणावर जे सध्या सरकार राज्यकारभार करते ते ब्रिटिश सरकार नसून काँग्रेस सरकार आहे. ब्रिटिश सरकारचा मला ११ वर्षांचा अनुभव आहे व काँग्रेस सरकारचा ११ महिन्यांचा अनुभव आला आहे. काँग्रेस अधिकारारूढ होण्यापूर्वी मला जास्त आशा होती, परंतु ती फोल ठरली आहे. ब्रिटिश सरकारच्या वेळेस पोलिस खात्यात अस्पृश्यांना शिरकाव नव्हता. मी असेंब्लीत २ वर्षे भांडण करून शिरकाव करून घेतला. ब्रिटिश सरकार काही तरी देत असे. ब्रिटिश सरकार पडित जमिनीबद्दल अस्पृश्यांच्या अर्जाचा अगोदर विचार करीत असे व तसे त्यांच्या दप्तरीही आहे. ते कचेरीत सापडू शकेल. पोलिस खात्यात अस्पृश्यांच्या अर्जाचा अगोदर विचार करावा. ब्रिटिश सरकारने आमच्याकरिता काहीही राखून ठेवलेले नाही असे दिसून येईल. सगळ्यांच्या बरोबर काही लाभ झाला तर तुम्ही घ्यावा. एका आईच्या पोटी जन्मास आलेल्या चार मुलांपैकी मोठ्या मुलास भाकरीचा मोठा भाग मिळतो. आई लहान मुलाकरीता भाकरी लपवून ठेवते तसे आपल्याकरिता काँग्रेसने काय राखून ठेवलेले आहे ? काँग्रेस आमच्याकरिता काहीच राखून ठेवत नाही. मग ती माय कशी होऊ शकेल ? आम्हाला मायेच्या लोभाव्याची जरूर नाही. आम्ही मरू व मनगटाच्या जोरावर मिळवू. आम्ही डरणार नाही व टोपली घेऊन दुसऱ्याच्या दारीही जाणार नाही. मायेच्या कॉँग्रेसचे काय आहे. मी गांधींचा शत्रु नाही. ज्याला जे सत्य वाटते तो ते करतो. मी गांधींच्या कार्याची पर्वा करीत नाही. गांधींच्या हातात काँग्रेस आहे. ' राजा बोले आणि दल हाले ' गांधी बोलतो व काँग्रेस करते. गांधींच्या मनात आले, अस्पृश्यांना सवलती देण्याचे ठरवले तर त्यास खावयास मिळेल. गांधींच्याविरूद्ध कोणीही जाणार नाही. ' कळवळ्याच्या याती आणि लोभाविन प्रिती. ' आईचे प्रेम सर्व मुलांवर सारखे असते. करंट्या मुलावर सुद्धा जास्त असते. काँग्रेसची ब तुमची आई गांधी आहे. अर्थात गांधींचे प्रेम तुमच्यावर जास्त असले पाहिजे,
तसे मुळीच दिसत नाही. करिता दुसऱ्यावर विश्वासला त्याचा कार्यभाग बुडाला
याप्रमाणे आपले कार्य आपणच करावयास पाहिजे. आपल्यावर फारच मोठे
संकट आहे. ते तुम्हास दिसत नाही. २००० वर्षांची परिस्थिती तुमच्या