हे लोक |
आणि भाषणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन १७६
हे लोक झाले आहेत ते राजकारणाच्या बाबतीत उदासीनच आहेत.
अथवा तशाच स्वरुपाच्या काही कारणांमुळे आलेले असतील. हे असो. डॉ. खरे तरी आपल्यापुढे आज तीन भिन्न स्वरुपात उभे आहेत, शंका नाही. पहिली गोष्ट म्हणजे ते महाराष्ट्रीय आहेत, दुसरी गोष्ट म्हणजे ते काँग्रेसवाले आहेत आणि तिसरे त्यांचे स्वरुप म्हणजे मध्यप्रांतातील पदच्युत केलेले मुख्यप्रधान या नात्याने ते येथे उभे आहेत. आजच्या प्रसंगी येथे येऊन अध्यक्षस्थान स्वीकारण्यास मी का उद्युक्त झालो असेन असे आपल्याला वाटते ? डॉ. खरे यांची व माझी भेट होण्याचा योग पूर्वी कधीही आला नव्हता. काल अगदी एका समस्नेह्याच्या कचेरीत गाठ पडली व तेथेच डॉ. खऱ्यांची व माझी प्रथम ओळख झाली. अर्थात त्यांच्या राजकारणाने आकृष्ट होऊन मी काही येथे आलेलो नाही. ही गोष्ट स्पष्टच आहे. राजकारणाच्या बाबतीत आम्ही अनेकांना भिन्न व विरोधीच आहोत.
डॉ. खरे महाराष्ट्रीय आहेत ही गोष्टही महत्वाची आहे. त्यांच्या बाबतीतील
- अन्यायामुळे बऱ्याच महाराष्ट्रीयांची मने विशेष क्षुब्ध व्हावयाला ही गोष्ट कारणीभूत झाली आहे हे निःसंशय होय आणि तसे होणे स्वाभाविक आहे. हिंदी राजकारणातील महाराष्ट्रीयांचा वाट्याचा इतिहास पाहिला तर
महाराष्ट्रीय त्यात मागे पडत चालले आहेत ह्या गोष्टीबद्दल मला तरी निदान शंका वाटत नाही. महाराष्ट्रीय लोक व्यापारात आतापर्यंत कधीच पडलेले
नाहीत. त्यामुळे विपुल द्रव्य अथवा पैसाही त्यांनी कधी केला नाही. ज्यावेळी इतर भागातले हिंदी लोक परकीयांच्या जुलुमाखाली पीडले जात होते, त्यावेळी महाराष्ट्रीयांच्या पूर्वजांनी आपले सारे आयुष्य स्वराज्याचा कारभार हाकण्यात
घालविले. त्यांचे रक्त त्यापायी खर्ची पडले. महाराष्ट्रीयांची पिछेहाट का होत चालली आहे याबद्दलही परवाच एका काँग्रेस पुढाऱ्याने मुंबईतील आपल्या एका भाषणात मीमांसा केली. महाराष्ट्रीयांना व्यवहारज्ञान कमी म्हणून ते मागे पडत आहेत असे त्यांचे म्हणणे आहे. पण मला ही गोष्ट मुळीच पटत नाही. माझ्या मते महाराष्ट्रीयांइतकी व्यवहारबुद्धी हिंदुस्थानातील इतर कोणाही प्रांतीयात आढळू शकणार नाही. महाराष्ट्रीयांचा ऱ्हास इतर कोणत्याही कारणाने झालेला असो, पण व्यवहारबुद्धीच्या अभावामुळे मात्र तो खचित झालेला नाही. महाराष्ट्रीयांची पिछेहाट का झाली याचे कारण त्यांचे जीवित महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी कामी आले, राजकारण खेळविण्यात, राज्यकारभार