४-८-१९३८ महाराष्ट्रीयांची पीछेहाट का ? - Page 219

महाराष्ट्रीयांची पीछेहाट का ? १८१

कर्तव्यच असते, मग त्या प्रश्‍नाला दोन बाजू खरोखरच असोत किवा नसोत. प्रत्येक प्रश्‍नाला दुसरीही एक बाजू आहे हे कळून घ्यावयास पाहिजे. काँग्रेस जी सांगते तीच त्या प्रश्‍नाची एकच एक बाजू होय. दुसरी

बाजू तिला नाही असे मानता कामा नये.

दुसरी एक गोष्ट आपण शिकावयास पाहिजे ती ही की, सरकारची नेहमीच

कसोटी घेत राहिल्या खेरीज लोकशाही सुरक्षित राहणे शक्य नाही. सुलतानशाही अथवा एकसत्ता आणि लोकशाही अथवा लोकसत्ता यामधला फरक काय ? राज्यशास्त्राचे पंडित याची व्याख्या काय देतील हे मला ठाऊक नाही, पण राजकारणी इसम या नात्याने मला त्यामध्ये हाच एक खरा फरक दिसतो की, सुलतानशाहीमध्ये सरकारची कसोटी अथवा चौकशी कधीच होऊ शकत नाही. एकदा स्थापना झाली की, ती अव्याहत चालूच राहाते. मग ती हिंदी संस्थानातल्याप्रमाणे वंशपरंपरेने चालो, अथवा काही युरोपियन देशातल्याप्रमाणे एका डिक्टेटरशाहीच्या चाकोरीतून चालो, कशीही ती चालली, तरी एक गोष्ट स्पष्ट आहे ती अशी की. लोकशाहीमध्ये सरकारची कसोटी दरक्षणी लागत असते. आपल्या अस्तित्त्वाचे समर्थन प्रत्येक दिवशी सरकारला पटवून द्यावे लागते. आपल्या प्रत्येक कृत्याच्या रास्ततेबद्दलचा जाब द्यावा लागतो. तशी स्थिती सुलतानशाहीत नसते. सुरक्षितता तुम्हाला हवी असेल, प्रगती व्हावी अशी इच्छा असेल, तर सर्वचजण एकाच संस्थेला चिकटून राहू नका ! मग, इतर लोक काय वाटेल ते म्हणू द्या. त्याची पर्वा करू नका. मी काँग्रेसमध्ये जात नाही याचे कारण मला माझ्या कर्तृत्वाला व बुद्धीला साजेलशी जागा मला तेथे मिळू शकणार नाही हे नव्हे. मला तेथे दडवून टाकता येणे कोणालाही शक्य

होणार नाही. काँग्रेसमध्ये मी जात नाही याला तसेच कारण आहे आणि ते कारण हेच की, त्या संस्थेबाहेर राहणे हेच मला अधिक व अत्यंत आवश्यक

वाटते. टीकाकाराची भूमिका स्वीकारुन प्रत्येक प्रश्‍नाची दुसरी बाजू उलगडून दाखविणे हेच मला अधिक श्रेयस्कर वाटते आणि जनतेची फसवणूक करता येऊ नये म्हणूनच ही भूमिका मला पत्कराविशी वाटत आहे.

आपल्या लोकांच्या अंगचे वैशिष्ट्य सध्या व्यक्त होऊ लागल्याची जाणीव मला

सध्या होऊ लागली आहे. इंग्लंडमध्ये चालू असलेल्या जबाबदार राजसत्तेसारखी

सत्ता आपल्या देशात स्थापन करण्यासाठी आपण झगडलो आणि आमच्या

राज्यघटनेत तिचा अंतर्भाव करण्यास भाग पाडले, पण त्या राजसत्तेला निराळेच

विशिष्ट स्वरूप प्राप्त होत चालल्याचे जाणवू लागले आहे. जबाबदार

राज्यपद्धतीला आज वर्षानुवर्षे आपण पारखे झालो आहोत. आतापर्यंत