५-८-१९३८ घाण ज्यांनी केली, त्यांनीच ती काढली पाहिजे - Page 221

१४०

घाण ज्यांनी केली, त्यांनीच ती काढली [पाहिजे ] [: ]

मध्यप्रांताचे माजी मुख्यप्रधान डॉ. खरे यांच्या मुंबईच्या मुक्कामात त्यांचा जाहीर सन्मान करून त्यांच्या धोरणाला पाठिंबा देण्यासाठी ज्या जाहीर सभा व सत्कारसमारंभ झाले, त्या समारंभापैकी डॉ. खरे यांच्या चाहत्यांनी तारीख ४ ऑगस्ट रोजी त्यांना सर्व्हटस्‌ ऑफ इंडिया सोसायटीच्या दिवाणखान्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मेजवानी दिली. अशाच- प्रकारचा डॉ. खरे यांचा दुसरा जाहीर सत्कार तारीख ५ ऑगस्ट १९३८ रोजी परळ येथे श्री. जमनादास मेहता यांच्या अध्यक्षतेखाली एक प्रचंड सभा भरवून

करण्यात आला.

सभेला सुरवात झाल्यावर प्रारंभी डॉ. खरे यांनी भाषण करून आपला झगडा व्यक्तीसाठी नसून लोकशाहीच्या तत्त्वासाठी आहे, हा मुद्दा स्पष्टं केला व मध्यप्रांतातील कारस्थानांचा पाढा वाचला. त्यानंतर डॉ. आंबेडकर हे भाषण

करण्यास उठले. आपल्या भाषणात ते म्हणाले,

आजच्या प्रसंगी मला भाषण करण्याचे काही प्रयोजन आहे असे वाटत नाही. कालच सर्व्हटस्‌ ऑफ इंडिया सोसायटीच्या दिवाणखान्यामध्ये माझ्या

अध्यक्षतेखाली एक सभा झाली. तीत माझे सर्व म्हणणे मी सांगितले

होते. कालचे माझे भाषण इंग्रजीत झाले. परंतु मराठी वृत्तपत्रांचेही जासूद त्या वेळेला हजर होते. त्यांनी माझ्या भाषणाचा तरजुमा योग्य तोच दिला असेल

असे मला वाटते. |

मी काँग्रेसचा सभासद नाही हे तुम्हाला परिचित आहे. डॉ. खरे यांनी जी

कहाणी सांगितली ती त्यांच्या भाऊबंदकीच्या वादापैकी एक आहे. मी अर्थातच

तिन्हाईत आहे. या वादात मी का पडावे हा प्रश्‍न मला कोणी विचारला तर त्यात

वावगे काही आहे असे मला म्हणता येणार नाही. माझ्या पक्षातील माणसांनी

घरच्या भाकरी खाऊन या उचापती का करता असा प्रश्‍न करणे साहजिक

आहे. म्हणूनच माझा आज भाषण करण्याचा अधिकार नाही. परंतु तिऱ्हाईत

असलो तरीही व्यापक अर्थाने डॉ. खरे यांचा शेजारी आहे. एकाच वातावरणात

आम्ही जीवन कंठीत आहोत. शेजारच्या घरी आग लागली म्हणजे माझे घर

विविध वृत्त: २० ऑगस्ट १९३८.