घाण ज्यांनी केली, त्यांनीच ती काढली पाहिजे १८५
आहे. वल्लभभाईंनी गेल्या असेंब्लीच्या निवडणुकीत जे लोक उभे केले ते सर्व दगड आहेत, त्यांना काही हकक नाही, अधिकार नाही. वल्लभभाई पटेल, गांधी, बजाज, राजेंद्रप्रसाद, जवाहरलाल नेहरु हे लोक निवडणुकीत उभे राहिले नाहीत, मतदारांनी त्यांना कसला अधिकार दिला नाही. हे सर्व उपटसुंभ आहेत. सर्व जबाबदार राज्यपद्धतीचा एकच अर्थ आहे की, न्याय देणारी
शेवटची संस्था म्हणजे मंत्रिमंडळाला निवडून देणारा मतदारसंघच होय. या दृष्टीने पाहू गेले म्हणजे असे आढळून येते की, न्याय आणि सत्य हे डॉ. खरे
| यांच्याकडे असून वर्किंग कमिटीकडे न्यायही नाही व सत्यही नाही.
हे सर्व ठीक आहे. पण पुढे काय हाच प्रश्न मला महत्त्वाचा वाटतो. डॉ. खरे यांचे पुढे काय होणार, या प्रश्नाने माझ्या मनात काहूर उठले आहे. या वेळी मला माझ्या लहानपणच्या एका गोष्टीची आठवण होते. ज्या गावी आम्ही राहत होतो, तेथे आमच्या शेजारी एक कुटुंब राहत असे... त्यांना १०-१२ वर्षांची एक मुलगी होती. मुलगी लग्नाची झाल्यानंतर तिच्या आईबापांनी एक चांगलासा मुलगा पाहून तिचे लग्न केले. मुलगी नंतर सासरी राहावयास गेली, व ती तेथे आनंदात आहे या समजुतीवर तिचे आईबाप आपल्या गावी स्वस्थ राहिले. लग्न झाल्याला काही १०-4२ महिने झाले असतील, एके दिवशी चिठीचपाठी न पाठविता कोणा शेजाऱ्याबरोबर ती मुलगी आपल्या आईबापांच्या दारी दत्त म्हणून उभी राहिली व अगदी वरच्या सुरात ओक्साबोक्शी मोठमोठ्याने रडू लागली. आईबापांना वाटले की मुलीला झाले आहे तरी काय ? चांगला शिकला सवरलेला मुलगा पाहून दिला, घरदार चांगले बघून दिले, मग अचानक ही काय भानगड झाली ? मुलीच्या आईने आपल्या मुलीला पोटाशी धरली व काय झाले ते विचारू लागली. मुलीने आपल्याला सासुरवाडीस मारहाण, हाल-जाच कसे होतात या दुःखाचा पाढा वाचला. अंगावरून हात फिरवून पाहता मुलीच्या डोक्यात मोठी खोक पडलेली दिसली ! आईने मुलीची चोळी काढून पाहिली तो असे दिसून आले की, मुलीचे अंग मारामुळे चांगलेच सुजून आले आहे व पाठीवर मारामुळे मोठे वळही उठले आहेत. बिचारीने मुलीच्या पाठीला तेल-हळद लाविली. काही दिवसांनी ती मुलगी म्हणू लागली की, ज्या चुलीला आपण मला लाविली आहे तेथे माझे काही बरे वाईट व्हावयाचे असेल ते होईल. मला आपली सासरी पाठवा, असे म्हणून त्या मुलीने हट्ट धरला. आई-बाप यांनी मुलीला चोळी बांगडी केली. कपाळाला शेष भरली, ओटीत नारळ घातला आणि मुलीला लावून दिली. मुलगी पुन्हा सासरी. नांदावयास गेली. नवऱ्याकडील माणसे म्हणू लागली की, मुलगी पाहा किती सालस, ती आमच्याकडे नांदावयास कबूल. पण तिचे आई-बापच काही तरी तिला शिकवितात व अशातऱ्हेने मुलगी सासरी झाली गोड आणि तिला तिच्या