५-८-१९३८ घाण ज्यांनी केली, त्यांनीच ती काढली पाहिजे - Page 225

घाण ज्यांनी केली, त्यांनीच ती काढली पाहिजे १८७

खेर हे सुपात आहेत. मला वाटते, आमचे बाळासाहेब हे कधीच सुपात येणार नाहीत. एखादी चांगली सून असली म्हणजे तिला आपण (०09) सुलक्षणी

सून म्हणतो. बाळासाहेब खेर यांचे वर्तन सुलक्षणी सुनेप्रमाणे आहे. ज्या प्रमाणे (7881) सून दीर आला कर नमस्कार, सासरा-सासू आली कर नमस्कार,

नणंद आली कर नमस्कार, जाऊ आली कर नमस्कार, सगळ्यांशी'गोड बोलणारी, कोणाला कधी पाय लावायचा नाही, खाली वाकली तर पायाची पोटरी उघडी पडली आहे की काय हे पाहून मग वाकणारी, दररोज नवऱ्याच्या नावाने कुकू लावणारी, हे काही शांता आपटेचे कुंकू नव्हे, त्याला यश चितणारी, जन्मोजन्मी हाच नवरा मिळो म्हणून सावित्रीसारखी इच्छा करणारी, बाहेरच्या माणसांना सासरच्या माणसांनी शिव्या दिल्या तर त्याबद्दल कष्टी न होणारी अशी

असते. आमचे बाळासाहेब खेर हुबेहुब असे वर्तन करीत आहेत आणि म्हणून

मला असे वाटते की, १२ महिनेच काय १२ वर्षे देखील आमचे बाळासाहेब काँग्रेस

अधिकारात राहिले तर मुख्यप्रधान राहतील. अर्थात्‌ सुपात किंवा आंधणात

पडण्याची त्यांना कधीच वेळ येणार नाही. . एक मुलगी हिंदी घरात दिली, तिचे

असे झाले, एक मुलगी गुजरातेत दिली तिचे बरे चालले हे पाहून दुःखात सुख

म्हणून समाधान वाटते. पण काळाची गती फार विचित्र आहे. आमचे

बाळासाहेब खेर कदाचित कधी काळी जात्यात पडतील. तसे जर घडले तर

जसे डॉ. खरे मुंबई-पुण्याकडे आले, तर कदाचित आमचे बाळासाहेब खेर

नागपूरास जातील. अशा प्रसंगी डॉ. खरे यांनी त्यांच्या पाठीवर मायेचा हात

फिरवावा अशी माझी त्यांना विनंती आहे. (प्रचंड हंशा व टाळ्यांचा

. कडकडाट.) |

यानंतर डॉ. मुंजे व रा. वर्दे यांची भाषणे झाली व नंतर अध्यक्ष श्री. जमनादास

मेहता यांनी भाषण केल्यावर सभेचे काम संपले.

डॉ. खरे यांना ठगांच्या टोळीत न्याय मिळाला नाही याबद्दल आपणास नवल

वाटत नाही अशा अर्थाचे श्री. जमनादास मेहता यांनी उद्गार काढले. लोकशाही

विरुद्ध कारस्थान करणाऱ्या कंपूला डॉ. खरे यांनी अटक करणे जरूर

होते. असाही अभिप्राय त्यांनी प्रकट केला.

७ ७ ७