१४१
दीर्घोद्योग व कष्ट करण्यानेच [यशप्राप्ती ] [होते ]
“ पुणे येथील अस्पृश्य विद्यार्थ्यांचे ११ वे संमेलन रविवार ता. ११ सप्टेंबर १९३८ रोजी, पुणे येथे डी. सी. मिशनच्या हॉलमध्ये भरवण्यात आले. संमेलनाचे अध्यक्ष व मुख्य वक्ते म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची निवड करण्यात आली
होती.
संमेलनाच्या पूर्वी शनिवारी व रविवारी, विद्यार्थ्यांचे मर्दानी व मैदानी खेळ, एक नाट्य प्रयोग, वक्तृत्व कलेची चढाओढ व भोजन वगैरे कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पडले होते. या कामी मि. टी. बी. भोसले, संमेलन सेक्रेटरी व त्यांच्या सहकारी मित्रमंडळींनी बरीच मेहनत घेतली होती. संमेलनाचे चेअरमन श्री. राजाराम भोळे, एम. एल. ए. यांनी संमेलन चालक मंडळीस जे उत्तेजन व सहाय्य केले त्यामुळे, या वर्षाचे संमेलन विशेष यशस्वी झाले असे म्हटल्यास अतिशयोक्ती नाही. यंदाच्या संमेलनाच्या चिटणीस मंडळीत कु. घटकांबळे या विद्यार्थीनीने सहकार्याने काम केले होते. कॉलेज विद्यार्थिनींमध्ये त्या पहिल्याच विद्यार्थिनी होत
संमेलनाचे मुख्य चिटणीस मि. भोसले यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात गेल्या १० संमेलनाचे महत्त्व निवेदन केले. या संमेलनाला आमदार भाऊराव गायकवाड, डी. जी. जाधव. के. एस. सावंत, रोहम, वराळे, काळे, बॅकवर्ड क्लास ऑफिसर श्री. देवधर, भा. र. कद्रेकर, सौ. गीताबाई गायकवाड, श्री. बाबुराव भातनकर, गंगाधर घाटगे, सुपरवायझर श्री. ढिखळे, के. आर. मधाळे वगैरे मंडळी प्रामुख्याने हजर होती. “ १
या ११ व्या अस्पृश्य विद्यार्थी संमेलनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले
आजचे हे संमेलन जरी विद्यार्थ्यांचे असले तरी येथे बसलेल्या समूहाकडे पाहिल्यास येथे विद्यार्थ्यापिक्षा विद्यार्थ्येतर अधिक आहेत असे दिसून | येईल. जसे भाताच्या खिचडीत तांदळापेक्षा डाळच जास्त पडावी तशी स्थिती या संमेलनाची झाली आहे. ज्याअर्थी हे विद्यार्थी संमेलन आहे त्याअर्थी विद्यार्थ्यांना उपदेशपर दोन शब्द सांगणे मी माझे कर्तव्य समजतो. कारण मी जो आज येथे आलो आहे तो विद्यार्थ्याच्या संमेलनासाठी आलो आहे. आजच्या
१ जनता: १ ऑक्टोबर १९३८.