११-९-१९३८ दीर्घोद्योग व कष्ट करण्यानेच यशप्राप्ती होते - Page 227

दीर्घोद्योग व कष्ट करण्यानेच यशप्राप्ती होते १८९

संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारताना मी कार्यकारी मंडळास काही अटी

घातल्या. त्या सर्व विद्यार्थी मंडळाने मान्य केल्या असल्यामुळे आजच्या या

संमेलनाचे वैभव व शोभा थोडी कमी झाली असेल. माझे भाषण मुख्यतः

विद्यार्थ्याकरिताच असल्याने इतरेजनास ते जरी नीरस वाटण्याचा संभव आहे,

तथापि, ते विद्यार्थ्यांना आवडेल असे मला वाटते. विद्यार्थ्यांनी मला ही संधी

दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद देणे हे माझे कर्तव्य समजतो.

माझे आयुष्य सध्या. खेड्यापाड्यातील अशिक्षित, अडाणी, जुलूमाने त्रस्त

झालेल्या अशा लोकांची गाऱ्हाणी ऐकून ती निवारणार्थ खटपट करण्यात व

त्यांच्या विवंचनेत जात आहे. त्यामुळे विद्यार्थी वर्गाकडे जितके द्यावयास पाहिजे

तितके लक्ष देण्यास अवसर सापडत नाही. त्यामुळे मी विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष

करतो असा काहींचा समज झाला असून कधी कधी तसा सूरही निघत असल्याचे

मी ऐकले आहे. परंतु एक गोष्ट प्रथम मी तुम्हास सांगू इच्छितो ती ही की,

एकटा मनुष्य आपल्या आयुष्यात विविध प्रकारची कार्ये उत्तमतन्हेने पार पाडू

शकत नाही. या बाबत एका ग्रंथकर्त्याचे सुभाषित मला आठवते. ॥ ४०५

want success you must be narrow minded. वरील म्हणण्यात फार मोठा

अर्थ भरलेला आहे. कारण एकटा मनुष्य सर्वच गोष्टी करू म्हणेल तर तसे करणे त्याला अशक्य होईल. तेव्हा एक ना धड भाराभर चिंध्या यासारखे कोणतेही एक कार्य धड न करता अनेक कार्यांना हात घालणे योग्य नाही. आपल्या समाजाच्या दृष्टीने विचार केल्यास आपणास उपलब्ध असलेली साधन सामुग्री फारच अल्प आहे. तेव्हा माणसाने लहान लहान कार्ये हातात घेऊन ती पार पाडण्याचा प्रयत्न करावा हे उत्तम आणि म्हणूनच दीनदुबळ्या, स्पृश्य समाजाच्या जुलूमाने त्रस्त झालेल्या अडाणी समाजाच्या कार्याचा बोजा मी शिरावर घेतला आहे आणि त्या कार्यामुळे विद्यार्थ्यांकडे जितके लक्ष द्यावयास हवे तितके देता येणे शक्य नाही. अर्थात त्याचा अर्थ मी विद्यार्थ्याच्या विरूद्ध आहे असे नाही. उलट मी जरी राजकारणात, समाजकार्यात पडलो असलो तरी मी आजन्म विद्यार्थी आहे. तेव्हा विद्यार्थ्याला विद्यार्थ्याविरूद्ध कसे राहता येईल ? मला अभ्यासासाठी लागणारी पुस्तके वारंवार घ्यावी लागतात. आज मजवर रु. १००० (एक हजार) पुस्तकांच्या खरेदीचे देणे आहे. असे जरी असले तरी माझी पत दांडगी आहे. ती अजून गेली नाही. मुंबईतील कोणत्याही पुस्तकाच्या दुकानातून मी पुस्तके उधार आणू शकतो. परंतु माझ्या विद्यार्जनाच्या कार्यात खंड पडू देत नाही, कारण विद्यार्जन हे माझे दांडगे व्यसन होऊन बसले आहे. तेव्हा विद्यार्थ्याच्या विरूद्ध मी कसा राहीन ?

विद्यार्थ्यांनी विद्यार्जनानंतर गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यानंतर कसे वागावे या बाबत उपदेश करण्यास मी अपात्र आहे. त्यांना कोणत्या प्रकारचा उपदेश करावा म्हणून मी बुचकळ्यात पडलो आहे. कारण माझा गृहस्थाश्रम फुकट