दीर्घोद्योग व कष्ट करण्यानेच यशप्राप्ती होते ` १९१
पुढारलेल्या लोकांच्या स्त्रियांनी पितळेचे दागिने वापरल्यास ते सोन्याचेच
असावेत हा समज दृढ झाला आहे. तद्वतच इतर बाबतीतही आपले झाले
आहे. आपण कोणतेही कार्य जेव्हा त्यांच्यापेक्षा शतशः चांगले करू तेव्हा कोठे त्यांच्या बरोबरीचे म्हणून आम्ही गणले जाऊ. हे सर्व करण्यासाठी आमच्यात
आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे.
आत्मविशवासासारखी दुसरी दैवी शक्ती नाही. आम्ही आमच्यातील आत्मविश्वास गमावता कामा नये. उदाहरणार्थ, कुस्ती खेळण्यासाठी आखाड्यात उतरलेल्या पहिलवानाने दुसऱ्याच्या ठणठणीत दंड थोपटण्याने घाबरून गर्भगळीत झाल्यास त्याच्या हातून काहीतरी होणे शक्य आहे काय? मी तर नेहमी असे म्हणत असतो की मी जे करीन ते होईल.. अर्थात, मी हे सर्व
आत्मविशवासावर अवलंबून म्हणत असतो. माझ्या या म्हणण्यामुळे काही लोक
मला घमेंडखोर, प्रौढीबाज वगैरे दूषणे देतील. परंतु ही प्रौढी अगर घमेंड नसून
आत्मविश्वासामुळेच मी हे म्हणू शकतो. मी मनात आणीन तर सव्या लाखाची
गोष्ट सहज करीन. मी सुद्धा तुमच्या सारखाच एका महारीन बाईच्या पोटी
जन्मास आलो आहे. गरिबीच्या दृष्टीने विचार करिता आजच्या गरिबातील
गरीब विद्यार्थ्यपिक्षा माझी त्यावेळी मोठी चांगली सोय अगर मला इतर अनुकूलता
होती असे नाही. मुंबईच्या डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या चाळीत दहा फूट लांब
व दहा फूट रुंद अशा खोलीत आई-बाप, भावंडे यांच्यासह राहून एका पैशाच्या
घासलेट तेलावर अभ्यास केला आहे. इतकेच नव्हे तर अनेक अडचणीना व
संकटांना त्याकाळी तोंड देऊन मी जर एवढे करू शकलो तर तुम्हास आजच्या
साधन-सामुग्रीने सज्ज असलेल्या काळात अशक्य का होईल ? कोणताही
मनुष्य सतत दीर्घोद्योगानेच पराक्रमी व बुद्धिमान होऊ शकतो. कोणीही मनुष्य
उपजत बुद्धिमान अगर पराक्रमी निपजू शकत नाही. मी विद्यार्थी दशेत
इंग्लंडमध्ये असताना ज्या अभ्यासक्रमास ८ वर्ष लागतात तो अभ्यास मी २ वर्षे
३ महिन्यात यशस्वीतऱ्हेने पुरा केला. हे करण्यासाठी २४ तासापैकी २१ तास
अभ्यास करावा लागला आहे. जरी माझी आज चाळीशी उलटून गेली असली
तरी मी २४ तासापैकी सारखा १८ तास अजूनही खुर्चीवर बसून काम करीत
असतो. अलिकडच्या तरुणाला तर अर्धा तास तो सारखा बसला की
चिमट्याच्या चिमट्या तपकीर नाकात कोंबावी लागते. नाही तर सिगारेटस्
ओढीत हातपाय ताणून काही काळ पेंगल्याशिवाय उत्साह येत नाही. मलाया
वयातसुद्धा यापैकी कशाचीही गरज भासत नाही. |
दीर्घोद्योग व कष्ट करण्यानेच यशप्राप्ती होते. नुसत्या पदव्या मिळविण्याने
काही होणार नाही. कारण पदव्या म्हणजे ज्ञान नसून शिक्षकाच्या मदतीशिवाय
ज्ञानार्जन करण्यास जमविलेली साधन सामग्री होय. विश्वविद्यालयाच्या पदव्या