११-९-१९३८ दीर्घोद्योग व कष्ट करण्यानेच यशप्राप्ती होते - Page 230

१९२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेंखन आणि भाषणे

व बुद्धिमत्ता याचा काही संबंध नाही. या बाबतीत एक मननीय उदाहरण आपल्या माहितीसाठी देईन. मरहूम ७ वे एडवर्डच्या नंतर पंचम जॉर्ज हे जेव्हा १९११ साली गादीवर बसले त्यावेळी ते हिंदुस्थानात येऊन गेल्यानंतर हिंदुस्थानातील विश्वविद्यालयांना अनेक लाखांची ग्रँट दिली. अर्थात्‌ त्या ग्रँटच्या रकमेतून गणितशास्त्रात पारंगत असलेला प्रोफेसर बोलावून त्याचा लाभ आपल्या देशास देण्याचे ठरले व त्याप्रमाणे त्यास बोलावण्यात आले. येथे आल्यानंतर जे एम. ए. असतील त्यांनीच त्याच्या क्लासला हजर राहावे असे ठरले. त्यावेळी मद्रास येथे रामानुज नावाचा रेल्वेच्या ऑफिसात दरमहा रु. २० वर काम करणारा एक कारकून होता. त्यास आपले काम सांभाळून या गणित पारंगताची व्याख्याने ऐकण्याची इच्छा अनावर झाली. त्याने आपल्या व्याख्यानाला मला हजर राहाण्याची परवानगी असावी म्हणून विनंती केली. परंतु रामानुज हा नुसता मॅट्रिकच असल्याने तो या वर्गात आला असता त्यास काही समजणार नाही असे प्रथम या गणित पारंगतास वाटले. तथापि रामानुजास यायचे असल्यास त्याला वर्गात हजर राहाण्याची परवानगी देण्यात आली. रामानुजाने त्या प्रोफेसराची पाचसहा व्याख्याने ऐकली. परंतु दर व्याख्यानाच्या वेळी तो गणितशास्त्रात पारंगत असलेल्या प्रोफेसरची भाषणे ऐकण्याऐवजी आपल्या वहीवर दुसरे काहीतरी लिहित बसत असे. त्यामुळे प्रोफेसर मजकूर संतापून त्यांनी त्यास खूप दोष दिला. दिलेल्या संधीचा तू दुरुपयोग करीत आहेस म्हणून म्हटले, त्यावर रामानुजाने सांगितले की, ' महाराज, आपण आज शिकवीत आहात ती गणिताची प्रमेये मी विद्यार्थी दशेतच सोडविली आहेत. त्यात नवीन असे मला काहीच आढळत नाही. इतकेच नव्हे तर ही पुढीलही प्रमेये मी ज्या वहीवर सोडवून ठेवली आहेत ती मजजवळ आहेत. ' प्रोफेसर मजकूर यांनी त्याच्या वह्या तपासल्या, त्याने गणित शास्त्राचे मोठमोठे अजब प्रॉब्लेम्स सोडविले होते. ते पाहून प्रोफेसर मजकूर यांनी गव्हर्नमेंट ऑफ इंडियास लिहून कळविले, जो इसम गणित शास्त्रात इतका पारंगत आहे त्यास खर्डे घासण्यास दरमहा रु. २० पगारावर ठेवण्यात आले असल्याने खेद प्रदर्शित करण्यात आला. इतकेच नव्हे तर सदर प्रोफेसरांनी त्यास विलायतेस बोलावून त्याच्या ज्ञानाचा फायदा घेण्यासाठी त्यास बड्या पगारावर, गणितशास्त्रात पारंगत असल्याने, तिकडील लोकांना गणित शिकविण्यासाठी नेले व आपण स्वतः त्याचा विद्यार्थी झाला. परंतु रामानुज हा ब्राह्मण असल्याने त्याचे ब्राह्मण्य आड आले. त्यानी विलायतेला जाताना आपल्याबरोबर लागणारी स्वयंपाकाची सारी सामग्री नेली होती. विटाची चूल करून त्यावरच स्वतः स्वयंपाक करून तो जेवीत असे. युरोपियन्स हे यवन आहेत तेव्हा त्यांना स्पर्श झाल्यामुळे सकाळ |

संध्याकाळ त्यास थंड पाण्याने स्नान करावे लागे. इंग्लंडमध्ये कडाक्याच्या