११-९-१९३८ दीर्घोद्योग व कष्ट करण्यानेच यशप्राप्ती होते - Page 231

दीर्घोद्योग व कष्ट करण्यानेच यशप्राप्ती होते १९३

थंडीमध्ये जेथे युरोपियन लोक फार झाले तर शुक्रवार खेरीज स्नान करीत नसत तेथे हा पठ्ठा दररोज सकाळ संध्याकाळ थंड पाण्याने स्नान करीत

असे. स्नानाने त्यास निमोनिया झाला व त्यातच त्याचा अंत झाला. तसेच लिबरल पक्षाचे श्री. चितामणी हे अत्यंत बुद्धिमान, [हुषार ] [म्हणून ] [त्यांचा ] [बोलबाला ] आहे. इतकेच नव्हे तर सबंध हिंदुस्थानात पहिल्या दर्जाचा संपादक व लेखक म्हणून त्यांची ख्याती होती. आपल्या विद्यार्थ्यांची अशी समज झालेली दिसते की, बी. ए. पदवीधर झाला की आता पुढे काहीच शिकावयाचे राहिले नाही, परंतु

खैरे पाहाता बी. ए. झाल्यावर फार झाले तर शिक्षकाशिवाय स्वतंत्रपणे अभ्यास करता येईल. म्हणजेच जे शिकायचे आहे ते पुढेच असते. माणसाने जन्मभर जरी शिकायचे मनात आणले तरी विद्यासागराच्या कडेला असलेल्या गुडघाभर ज्ञानात फार झाले तर जाता येईल.

: विद्येबरोबरच आमच्यात शील पाहिजे. शीलाशिवाय विद्या फुकाची आहे. कारण विद्या एक शस्त्र आहे. एखाद्याजवळ विद्येचे शस्त्र असेल व तो झ्षैलवान असेल तर त्यायोगे तो एकाचे संरक्षण करील, तर तोच इसम [शील ] [नसेल ] बैर विद्येच्या शस्त्राने दुसऱ्याचा घात करील. विद्या ही तरवारीसारखी आहे $रंतु तिचे महत्त्व तिला धारण [करणाऱ्यावर ] [अवलंबून ] [राहील. ] कारण अडाणी मनुष्य कोणास फसवू शकत [नाही. ] फसवावे कसे हेच त्याला उमगत बाही. परंतु शिकल्या सवरलेल्या [लोकांच्या ] [ठिकाणी ] [कोणास ] [कसे ] [फसवावे ] [व ] तधा फसविण्यासाठी लागणारा [युक्तिवाद ] [असल्याने ] [खऱ्याचे ] [खोटे ] [व ] [खोट्याचे ] खरे ते भासवू शकतात. दरेक खेडेगावात तेथे असलेले [ब्राह्मण, ] [वाणी ] [व ] [इतर ] शिकले सवरलेले गावगुंड लबाड्या [करून ] [कसे ] [फसवितात ] [हे ] [आपण ] [पाहिले ] 'ञ्जेसेलच. लबाडी करण्यास चातुर्य व [बुद्धी ] [लागते. ] परंतु चातुर्य व बुद्धी हिला सेदाचाराची अर्थात शीलाची [जोड ] [मिळाली ] [तर ] [तो ] [लबाडी ] [अगर ] [फसवाफसवी ] करू शकणार नाही आणि [म्हणून ] [शिकल्यासवरलेल्या ] [लोकात ] [शीलाची ] अत्यंत जरुरी आहे. शीलाशिवाय जर शिकले [सवरलेले ] [लोक ] [निपजू ] [लागले ] वर त्यांच्या शिक्षणातच [समाजाचा ] [व ] [राष्ट्राचा ] [नाश ] [आहे. ] तेव्हा शीलाची शिक्षणापेक्षा किती अधिक [किंमत ] [आहे ] [हे ] [तुमच्या ] [ध्यानी ] [आले ] [असेलच ] [आणि ] [म्हणून ] प्रत्येक इसमात प्रथम शील [असले ] [पाहिजे. ]

माझे भाषण संपविण्यापूर्वी राजकारणाविषयी दोन शब्द सांगणे या ठिकाणी भी माझे कर्तव्य समजतो. सर्वसाधारणपणे आपल्यातील लोक गरिबीमुळे विद्येचा उपयोग पोट भरण्यापलिकडे करीत नाहीत. मी त्यांना त्याबद्दल दोष हैत नाही. शिकल्यासवरलेल्या लोकांपुढील अडीअडचणी तुम्ही दृष्टीआड

है (वाय) ४१०-१५