११-९-१९३८ दीर्घोद्योग व कष्ट करण्यानेच यशप्राप्ती होते - Page 232

आणि भाषणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन १९४

समाज आहे. त्यामुळ करून चालणार नाही. आज अधिकारारूढ असलेला स्पृश्य

समाधानकारक त्यांचा मार्ग | स्पृश्य मानलेल्या समाजाची स्थिती फार आहे,

गत्या दृष्टीने सुकर आहे. परंतु त्याच्या उलट तुमचा मार्ग कटकमय आहे. उपायांनी तो मार्ग सोपा होऊ शकेल याचा तुम्ही सर्वानी एव्हापासूनच विचार करावयास पाहिजे. आपल्या समाजाची सर्वच बाजूने कुचंबणा होत आहे. तिचा पाढा या ठिकाणी वाचणे अशक्य आहे. आपण अल्पसंख्याक आहोत. संख्येच्या बळावर स्पृश्य मानलेला समाज वाटेल तो जुलूम सध्या करीत आहे. आज जरी आपण कोर्टकचेऱ्यात प्रवेश केला तर आपणास काय दिसेल ? मॅजिस्ट्रेट ब्राह्मण, कारकून ब्राह्मण, सर्कल इन्स्पेक्टर ब्राह्मण, तलाठी ब्राह्मण, मुन्सप बराह्मण, फौजदार ब्राह्मण. अशास्थितीत जर आपले खटले अशा कोर्ट कचेऱ्याकडे न्यायासाठी गेले तरी तेथे न्याय मिळतो काय? मुळीच

नाही. कित्येक खटल्यांच्या निवाड्यात मॅजिस्ट्रेट लोकांनी महारांच्या बाजूने

महार साक्षीदार आहेत सबब त्यांच्यावर विश्वास ठेवता येत नाही, असे म्हटले

आहे. परंतु स्पृश्य जातींच्या बाजूने स्पृश्य जाती साक्षीस असल्या तरी मॅजिस्ट्रेटास ते चालते. फार कशाला आजचे काँग्रेसचे दिवाण हे सुद्धा जो

कोणी काँग्रेसवाला असेल त्यासच मदत करण्यास तयार असतात. तेव्हा अशा

परिस्थितीत माऱ्याच्या जागा आपल्या ताब्यात आल्याशिवाय होत असलेला

जोरजुलूम थांबणार नाही. परंतु या जागा कशा मिळू शकतील, हा विचार करण्यासारखा प्रश्‍न आहे. आज तर चोर व लबाड अशांच्या गट्टी सारखी गट्टी

या स्पृश्य मानलेल्या काँग्रेसच्या लोकांची आहे. त्यांच्या गट्टीत जे सामील होतील त्यांच्याकडे ते जरा सहानुभूतीने पाहतील. जे लोक त्यांना सामील नाहीत त्यांच्याकडे खुनशीपणाने ते पाहत असल्याची प्रचिती आपणास आहेच. तेव्हा त्यासाठी मी आपणास दोन गोष्टी सांगू इच्छितो. पहिली गोष्ट अशी की, आपण सर्वानी संघटन केले पाहिजे. आपण जर सर्व अस्पृश्य मानले

गेलेले लोक एकत्रित झालो तर या भेदांच्या नगरीच्या किल्ल्यास कोठेतरी चीर गेल्याशिवाय राहणार नाही. लोक अडाणी आहेत. ते वाचू अगर विचार करू शकत नाहीत. गावातील शिरजोर लोकांच्या सांगण्याप्रमाणे अगर इच्छेप्रमाणे |

ते वागावयास तयार होतात. भीतीमुळे माणसे फुटून जाण्याचा फार संभव

असतो. या जुटीसाठी विद्यार्थी वर्ग काय करावयास तयार आहे ? विद्यार्थी वर्ग ही एकजूट कशी सांभाळील याबद्दल मोठी शंका आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या

विद्यार्थीदशेत विद्या प्राप्त करण्यासाठी कसून झटावे ही उत्कृष्ट समाधानाची गोष्ट

आहे. परंतु त्याचबरोबर या संघटनेच्या कार्याची अंशतः धुरा त्यांनी आपल्या

खांद्यावर घेतलीच पाहिजे. आपल्या साऱ्यांच्या इच्छा तृप्त करण्याचे सामर्थ्य आपल्या कोणातच नाही आणि म्हणून ज्यांनी त्यांनी आपल्या वैयक्तिक मनिषा