दीर्घोद्योग व कष्ट करण्यानेच यशप्राप्ती होते १९९५
अगर आकांक्षा पुऱ्या न झाल्या तर लगेच फटकून वागण्यात आपण आपला
| आत्मनाश करून घेत आहोत. तेव्हा या गोष्टी डोळ्यांपुढे ठेऊन स्वार्थास फाटा
॥ देऊन संघटना करण्यासाठी आपण सर्वानी झटावे. व्यक्तीयत स्वार्थापिक्षा
समाजाच्या फायद्याकडे आपण अधिक लक्ष दिले पहिजे.
दुसरी गोष्ट अशी की, आपला उद्धार करण्यासाठी हरिजन सेवक
संघासारख्या हजारो संस्था स्थापन झाल्या आहेत. परंतु त्यांचे अंतिम ध्येय
काय आहे ते उमगत नाही. त्यांचे कार्य कर्तव्य करण्याच्या इराद्याने सुरू आहे
की कोंबडीस दाणे टाकून कापण्यासाठी पकडण्याच्या स्वार्थी बुद्धीचे आहे ? या
संस्थांच्या लाभाचा काय परिणाम होईल, हा मोठा विचार करण्यासारखाच प्रश्न
आहे. या ब्राह्मणी संस्थेपासून आपल्या विद्यार्थ्यांनी फायदा उचलल्यास 'ज्याचे
मीठ खावे त्यास बेईमान होऊ नये ' या अनेक वर्षाच्या शिकवणुकीने आम्ही आमचे
स्वत्व विसरण्याची मोठी भिती वाटते. .या बाबत द्रोण व भीष्माचार्य यांची
उदाहरणे आपल्या डोळ्यांपुढे आहेतच. पांडवांचा प्रश्न जरी न्यायाचा असला
तरी तुम्ही त्यांच्याविरुद्ध कसे लढता असा प्रश्न भीष्पास विचारला असता त्यांची
उत्तर दिले की 'अर्थस्य पुरुषो दास:.'
' ज्यांचा मी भात खातो त्यांच्या बाजूने मला लढले पाहिजे. ' या उत्तरात
मनुष्याच्या सर्वसाधारण स्वभावाचे चित्र रेखाटले आहे आणि म्हणून स्पृश्य वर्गानी
काढलेल्या या संस्थांचा फायदा घेण्यापूर्वी तो आम्ही घ्यावा की नाही हा विचार
करण्यासारखा प्रश्न आहे. अर्थात याबाबत मला एक गोष्ट सांगावयाची आहे
ती ही की, पुरातन काळी देव व राक्षस यांचे युद्ध चालले होते. युद्धात
राक्षसाचा गुरु शुक्राचार्य यास संजीवनी विद्या अवगत असल्याने लढाइत मेलेल्या । राक्षसांना तो या जोरावर पुन्हा जिवंत करीत असे. परंतु देवांच्या बाजूने लढाईत
। मेल्यास त्यांना काही जिवंत करता येत नसे. त्यामुळे दिवसानुदिवस देवांचे
। सैन्य कमी होऊ लागले. तेव्हा सर्व देवांनी एकत्र बसून याचा खूप खल
केल्यानंतर असे ठरविले की, देवांच्या गुरुचा मुलगा कच यास राक्षसांच्या गुरुकडे
संजीवनी विद्या शिकविण्यासाठी पाठवावे. त्याप्रमाणे कच शुक्राचार्याकडे विद्या
शिकण्यास गेला. परंतु राक्षसांना देवांचे हे कारस्थान समजताच त्यांनी कचास
ठार मारले व त्यास जाळून त्याची रक्षा शुक्राचार्यास दारुमध्ये मिसळून पिण्यास
दिली. हेतु हा की, या कचाने शुक्राचार्याच्या देवयानी नावाच्या मुलीशी
प्रेमसंधान जुळवून तिला आपलीशी केले होते व त्याला संजीवनी विद्या शिकवावी
असा हट्ट ती आपल्या बापाजवळ धरून बसली. तिच्या आग्रहावरून जर
शुक्राचार्यानी कचास संजीवनी विद्या शिकविलीच तर मग आपली धडगत नाही,
या भीतीने व शुक्राचार्याच्या पोटात दारुद्वारे त्याची राख गेल्यास त्याला जिवंत
करावयाचे झाल्यास शुक्राचार्याना मरावे लागेल व अशा स्थितीत देवयानी भलता
वि (वाय) ४१०-१५ अ