डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे १९६
हे केले. हे सर्व हट्ट धरणार नाही असे राक्षसांना वाटून त्यांनी सर्व परंतु कारस्थान जेव्हा देवयानीस कळले तेव्हा तिने शुक्राचार्याच्या पोटात असलेल्या कचास प्रथम संजीवनी विद्या शिकविण्यास देवयानीने हट्ट धरला. त्यामुळे शुक्राचार्याने पोटात असलेल्या कचास ती संजीवनी विद्या शिकविली व नंतर मंत्रोच्चार करताच शुक्राचार्याचे पोट फाडून कच बाहेर पडला व त्यास अवगत झालेल्या विद्येच्या जोरावर त्याने शुक्राचार्यास पुन्हा जिवंत केले. अशी आख्यायिका आहे. परंतु देवयानीस तुझ्याशी लग्न करीन अशी जरी कबूली असली तरी आपले कार्य फस्त होताच ते तो सर्व विसरला व देवायानीशी लग्न न करताच तडक आपल्या गोटात निघून गेला. कचाच्या या कृत्यास अनेक लोक कृतघ्न म्हणतात. परंतु मी मात्र त्याचे ते कृत्य कृतघ्नपणाचे मानीत नाही. त्याचप्रमाणे आमच्या विद्यार्थ्यानी अनुकरण केल्यास मला त्यात वाईट वाटणार नाही. या बाबत इंग्रजीत असलेले सुभाषित मला आठवते.
“No man can be grateful at the cost of his honour, no woman can be grateful at the cost of her chastity and no nation can be grateful at the
cost: of its liberty ”
गांधींच्या आजच्या सत्य आणि अहिंसा या म्हणण्याचा मला अजून अर्थच कळला नाही. सत्य कोणास व केव्हा सांगावे याचे उत्तर गांधींनी अजून दिलेले नाही. कल्पना करा की माझ्या शेजारी एक श्रीमंत गृहस्थ आहे. तो माझा स्नेही असल्याने त्याची ठेव तो कोठे ठेवतो हे मला माहीत आहे. तेव्हा जर काही चोर आले व म्हणाले की तुमच्या शेजाऱ्याची ठेव कोठे असते ते सांगा. तर अशा
वेळी मी सत्य सांगून स्नेह्याचा घात करावा किंवा खोटे सांगून मित्राला वाचवावे ? अशी एक ना शंभर उदाहरणे देता येतील. असो.
शेवटी मला आपणास एवढेच सांगावयाचे आहे की, जर आपण एकजुटीने 'वागाल तर काहीतरी करू शकाल. आपल्या समाजावर हजारो वर्षांपासून होत असलेला जोर जुलूम व अन्याय निवारण करण्याचे कार्य आजच्या पिढीने स्वखुशीने आपल्या शिरावर घ्यावयास हवे आहे. आपल्या समाजात ऐक्याची अत्यंत जरूरी आहे व ऐक्यामुळेच आपण हे कार्य करू शकू अशी माझी खात्री आहे. |
या बाबतीत शिस्त अत्यंत कठोरपणे पाळली तरच काहीतरी होऊ शकेल. नाहीतर सर्वत्र बजबजपुरी माजून समाजनाश व नि:संघटना होईल. तरी अशा वेळी योग्य ती खबरदारी सर्वांनी घ्यावी. शेवटी आपल्यात संघटना, शील व शिस्त वाढवा व समाज उन्नतीस त्याचा फायदा द्या, एवढे सांगून आपली रजा
घेतो. “१
७ ७ ७
* डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भाषणे : -संपा. मा. फ. गांजरे, खंड-१-पृ. ५९-६७.