२०४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
लादली जाणार हे निश्चित. कामगारांना यातून कोणत्याही तऱ्हेची सुटका मिळण्याची आशा नाही. ही एक वर्षाची गुलामगिरी संपल्यानंतर काय ?
यानंतर कामगारांना संप करायचा असल्यास त्यांनी तशी अगोदर नोटीस दिली पाहिजे. म्हणजे प्रथम नोटीस देण्यात काही काळ निघून जाणार. त्यानंतर संपाच्या नोटीसीला उत्तर मिळेपर्यंत काही काळ जाणार. नोटीस देण्याच्या व उत्तर येण्याच्या या काळात कामगारांना संप करण्यास पूर्ण बंदी आहे. यानंतर तडजोडीचे प्रयत्न सुरू होणार. तडजोडीची बोलणी दोन महिने चालणार. ही बोलणी दोन महिन्यात संपलीच पाहिजे असे नाही. कामगारांचा पक्ष व मालक या दोघांची म्हणणी उभयपक्षी पटणारी असली तर कामगारांचे सुदैव, नाही तर तडजोडीच्या प्रयत्नांची मुदत चार महिनेपर्यंत वाढविण्याची तरतूद या बिलाने करून ठेवलेलीच आहे. म्हणजे कामगार व मालक यांच्यामध्ये वितुष्ट आल्यापासून चार महिने व आणखी वर पंचवीस दिवस. इतक्या मुदतीत कामगारांनी कोणत्याही प्रकारची हालचाल करता कामा नये.
या काळात कामगारांनी प्रचार करायचा नाही, संघटना करायची नाही, सभा नाही, मिरवणूका नाही, भाषणे नाही, काही नाही. या काळात कोणत्याही तर्हेची
तयारी करण्यास या बिलाने कायद्याने कामगारांना बंदी केली आहे, कायद्याने शिक्षा ठेवलेली आहे आणि समजा या चार महिने पंचवीस दिवसाच्या दीर्घ काळात (Period of Gestation) कोणत्याही तर्हेची तडजोड यशस्वी झाली नाही तर कामगारांनी काय करायचे? तडजोडीचा हा काळ संपल्यानंतर कामगारांना संप जाहीर करण्यास फक्त दोनच महिन्यांची मुदत ठेवलेली आहे. तडजोडीचा लांबलचक काळ व्यर्थ गेल्यानंतर असंघटित व विस्कळीत बनलेल्या कामगारांना प्रत्यक्ष प्रतिकाराची फिरून तयारी करण्यास दोन महिन्यांचा हा अल्प काळ पुरेसा आहे अशी सरकारची समजूत आहे की काय, हे मला समजत
नाही.
कामगार चळवळीत विशेष असा मी भाग अद्यापि घेतलेला नसल्यामुळे संपाकरता कामगारांचे संघटन करण्यास कामगार पुढाऱ्यास प्रत्यक्ष कोणत्या