१५-९-१९३८ कामगारांवर गुलामगिरीची बंधने लादणे हे लोकशाहीचे विडंबन - Page 246

२०८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

घडवून आणणाऱ्या गृहस्थांच्या पुढे नुसते मागण्यांचे प्रदर्शन करण्यापलिकडे काही निष्पन्न निघेल असे मला वाटत नाही. ह्या निरनिराळ्या टप्प्यांमुळे कोणताही निश्चित निकाल लागणे शक्‍य नाही. संप करण्यास तयार झालेल्या मजुरांना “ शांत “ करण्याचा हा मार्गच नव्हे. यामुळे कामगारांच्या दृष्टीने इतकाच परिणाम होणार की, चार महिने पंचवीस दिवस विलंब लागल्यामुळे कामगारांच्या संघटनेचा विचार होऊन कामगार मात्र संप करण्यास असमर्थ ठरतील !

१९३४ च्या कायद्यात व आजच्या बिलात असलेला एक महत्त्वाचा फरक मी येथे आपल्या नजरेस आणू इच्छितो. १९३४ च्या कायद्यावर वादविवाद चालू असताना तडजोडीच्या काळात संपास बंदी असावी अशी सूचना आणण्यात आली होती. संपास बंदी न केल्यास निदान पिकेटींगला तरी बंदी असावी अशीही सूचना आणण्यात आली होती. परंतु ह्या दोन्ही सूचनांना ऑनरेबल सर रॉबर्ट बेल यांनी मान्यता दिली नाही.

यावेळी एका सभासदाने डॉक्टरांच्या वरील म्हणण्याला हरकत घेतल्यामुळे डॉक्टरांनी रॉबर्ट बेल यांच्या त्यावेळच्या भाषणातील एक उतारा वाचून दाखविला.

माझे असे ठाम मत आहे की, कामगारांना वाटाघाटीच्या काळात संप करण्यास बंदी नसेल तरच तडजोड यशस्वी होणे शक्य आहे. मालकांना आपले सामर्थ्य एकवटण्याकरता चार महिने पंचवीस दिवस असताना, या चार महिने पंचवीस दिवसांच्या काळात कामगारांना संपाकरिता कोणत्याही तऱ्हेची संघटना व तयारी करणे शक्य नाही व वाटाघाटीचा काळ संपल्यानंतरही दोन महिन्यांच्या आत संप करण्याचे कागगारांवर नियंत्रण आहे. ह्या रार्व गोष्टी गाहीत असताना मालकांनी तरी योग्य अशी तडजोड घडवून आणण्यास तयार का व्हावे ? तडजोडीच्या कामगारांच्या अटी मालकांना स्वीकारण्यास भाग पडेल असे कोणत्याही तऱ्हेचे दडपण मालकांवर नाही. संपाचे दडपण असल्याशिवाय : मालक तडजोडीस कधीच तयार होत नसतात.

आपण योजलेल्या व्यवस्थेपासून मालकांच्या बरोबर कामगारांचाही फायदा. व्हावा अशी हे बिल आणणारांची खरोखरच जर इच्छा होती तर त्यांनी रॉबर्ट बेल ह्यांच्याच धोरणाचा अवलंब करून वाटाघाटीच्या काळात कामगारांना संप करण्याची बंदी ठेवायला नको होती. परंतु पूर्वीच्या नोकरशाहीनेही मान्य केलेले तत्त्व आजचे काँग्रेसचे ' लोकप्रिय ' व स्वतःस ' मजुरांचेही प्रतिनिधी ' म्हणून