आणि भाषणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन २१२
दाखविणार आहे. ह्या बिलान्वये रजिस्टर | १ आहे हे मी आपल्याला स्पष्ट करुन
झालेल्या असल्या पाहिजेत: झालेल्या युनियन्स १९२६ च्या कायद्याखाली रजिस्टर
प्रतिनिधी पाठविण्याच्या युनियन्सच्या। असे ठरविण्यात लवाद मंडळापुढे
बनविण्याचा अधिकाराबरोबर त्यांना कायदेमंडळात सुद्धा सभासद अधिकारही. मिळावा हा हेतू असावा असे मला वाटते. अशा तऱ्हेचे धोरण ट्रेड युनियन्सना अतिशय विघातक अंसे ठरणार आहे. ह्या सर्व अटी व शर्ती गुलाम युनियन्सच्या , फायद्याकरिता आहेत अशी माझी ठाम समजूत आहे. ४
ट्रेड युनियन्स मालकांच्या लहरीवर अवलंबून असाव्या असे जर स्पष्ट मत' काँग्रेस मंत्र्यांचे असेल तर त्यांच्याबरोबर वादविवाद करण्याची माझी इच्छाच . नाही. गुलाम मनुष्य हाच स्वतंत्र मनुष्य आहे असे जर काँग्रेस पक्षाला वाटत । असेल तर त्यांची मर्जी. ज्याप्रमाणे हे बिल कामगारांना संप बंदी करून बांधून ; टाकणार आहे, त्याप्रमाणे मालकांनी कामगारांना गुलाम युनियन्सतर्फे शृंखलाबद्ध | करावे असे जर काँग्रेस मंत्र्यांचे मत असेल तर त्यांच्याबरोबर विचारविनिमय कोण,
॥ करू शकणार ? मला ही विचारसरणी मान्य नाही. ज्या शांततेच्या स्वीकारार्थ 3 हे बिल आणले आहे तसली शांतता आम्हाला नको. जी शांतता श्रमजिवी वर्गाचे | नुकसान करीत आहे त्या शांततेचा मी निषेध करतो. |
ज्याचे प।< व्यवस्थित भरले जात आहे त्याच्याकरिता ही शांतता ठीक आहे, | ती भुकेकंगाल अशा श्रमजिवी वर्गाच्या हिताची ठरणार नाही. हिंदुस्थानात ट्रेड | युनियन्स चळवळ असावी तितकी जोरदार नाही हे कदाचित खरे असेल. काही| लोक ट्रेड युनियन्सना विघातक ठरवत असतील. परंतु जे काँग्रेसचे सभासदच!
होते, ज्यांना अहिंसा वगैरे काँग्रेसची तत्त्वे मान्य झालेली होती असे कम्युनिस्टादी पुढारी मजुरांच्या हिताला विघातक ठरतील अशी भीती काँग्रेस मंत्र्यांना वाटावी ।
ह्याचे मला फारच आश्चर्य वाटते. |
गुलाम युनियन्स काही काळानंतर स्वतंत्र बनणे शक्य आहे असे सरकारने सिद्ध,
केले तर मी माझे विचार बदलीन. परंतु मला असे वाटते की, गुलाम युनियन्स
कधीही स्वतंत्र बनणार नाहीत. कारण स्वतंत्र युनियन्सवर घालण्यात आलेल्या,
अटी अशक्य कोटीतील आहेत. त्या कधीच पुऱ्या करता येणार नाहीत. एखादी.
युनियन स्वतंत्र होण्याला त्या युनियनचे एकंदर कामगारांपैकी शेकडा ५०.१
सभासद असावे लागतील. ही योग्य अट आहे काय ? मजुरांना मालकांच्या
मान्यतेची गुलामगिरी टाळून स्वतंत्र व्हावयाचे तर त्यांच्यापैकी, शेकडा ५०
कामगार ट्रेड युनियन्सचे सभासद असले पाहिजेत ही अट शक्य कोटीतील आहे
काय ?