कामगारांवर मुलामगिरीची बंधने लादणे हे लोकशाहीचे विडंवन २१३
दृष्टी आपणास काँग्रेस मंत्र्यांनी अहमदाबाद येथील नमुनेदार परिस्थितीकडे
परिस्थिती आपल्यापुढे नमुना सांगितले आहे. ' अहमदाबाद येथील
आपणास उपदेश केला म्हणून ठेवून आपण त्याप्रमाणे वागावे असा सरकारने
आहे. मला हे सर्व कबूल आहे. परंतु मी असे विचारतो की, ह्या बिलान्वये
' अहमदाबाद मजूर महाजन ' ही संस्था सुद्धा स्वतंत्र युनियन होवू शकेल
काय ? ती युनियन स्वतंत्र कामगारांची युनियन होवू शकेल अशी मला शक्यता
दिसत नाही. अहमदाबादमधील थोडे मुसलमान सोडून सर्व गिरणी मालक व
गिरणी कामगार एकाच धर्माचे आहेत व ते एकच भाषा बोलतात. त्यामुळे मालक
व कामगार ह्यांच्यामध्ये वितुष्ट येण्याची कारणे थोडी कमी होतात. शिवाय
गुजरात हे महात्मा गांधींचे निवासस्थान असल्यामुळे त्यांच्यापुढे मालकांना व
कामगारांना आपली गाऱ्हाणी मांडता येतात व त्यांनी दिलेला निकाल दोघांनाही
निमूट मान्य करावा लागती. अशा परिस्थितीत ' मजूर महाजन ' ही युनियन
वाढलेली आहे. ती निदान वीस वर्षे टिकाव धरुन आहे, असे मला सांगण्यात
आले. माझ्याजवळ येथे १९३८ सालचे लेबर गॅझेट आहे. त्यावरुन असे | समजते की अहमदाबाद येथे कापसाच्या गिरण्यात एकंदर ९०,००० कामगार काम ' करितात. ह्या ९०,००० पैकी किती कामगार युनियनचे सभासद आहेत ? ' मजूर
; महाजन ' ही संस्था पाच निरनिराळ्या युनियन्स मिळून झालेली आहे व ह्या
। संयुक्त युनियनमध्ये एकंदर २२,००० कामगार आहेत म्हणजेच एकंदर कामगार । वर्गपैकी फक्त शेकडा २९ ह्या युनियनचे सभासद आहेत, असे असताना
अहमदाबाद मजूर महाजन ही मालकांच्या संमतीवाचून ह्या बिलान्वये रजिस्टर
होण्यास पात्र होईल काय ?
अहमदाबाद सारख्या इतक्या सुखदायक अशा परिस्थितीत असलेल्या ' मजूर
महाजन ' छया युनियनला सुद्धा स्वतंत्र युनियन होता येत नाही कारण हिला
रजिस्टर होण्याकरिता मालकांच्या संमतीवरच अवलंबून राहावे लागणार.
म्हणूनच ह्या बिलाने घातलेली अट अशक्य आहे. उद्योगधंद्यात पुढे गेलेल्या
` अशा इंग्लंड देशातसुद्धा ही अट अशक्यच ठरेल असे मला वाटते. मि. वाल्टर
यांच्या पुस्तकावरुन असे समजते की, इंग्लंडमध्ये एकंदर १८,०००,००० कामगार
आहेत व त्यापैकी ५,५३१,००० कामगार युनियन्सचे सभासद आहेत. जवळ
जवळ शेकडा ३० कामगार इंग्लंडमध्ये युनियनचे सभासद आहेत. ज्या
देशातील कामगार संघटित आहेत व उद्योगधंद्यांची वाढ जेथे अतिशयच झालेली
अशा इंग्लंड देशातं ही स्थिती, मग आपल्या मागासलेल्या हिंदुस्थानात ट्रेड
युनियन्सची स्थिती काय असेल ? कोणतीही युनियन एकदर कामगार