२१४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
वर्गापैकी शेकडा ५०.१ कामगार आपले सभासद करू शकणार नाही. ह्याचा परिणाम असाच होईल की मालकांच्या संपत्तीवर अवलंबून असलेल्या गुलाम युनियन फक्त मजूरवर्गातर्फे तडजोडीच्या वाटाघाटीत भाग घेऊ शकतील.
एका उद्योगधंद्यात अगर एका विविक्षीत स्थळी असलेल्या धंद्यात एकच युनियन असावी असे ह्या बिलाने ठरविण्यात येणार आहे. ह्या कलमामुळे हिंदी ट्रेड युनियन्सची वाढ खुंटेल असे मला वाटते, हे तत्त्व जगात कुठच्यातरी देशात लावण्यात आले आहे काय ? इंग्लंडमधील ट्रेड युनियन्सचा मी अभ्यास केला आहे व खात्रीलायक पुराव्यानिशी असे मी सांगू शकतो की, वरील तत्त्व इंग्लंडमध्ये लावण्यात आलेले नाही. कोणत्याही तत्त्वावर व धोरणावर मजूरवर्गाने आपली संघटना करावी अशी परवानगी इंग्लीश कायद्याने दिली आहे. एका उद्योगधंद्यात अगर एका धंद्यात एकच युनियन असावी हे तत्त्व इंग्लंडमध्ये व्यवहारात आणलेले नाही
ह्या वरील मुद्याच्या समर्थनाकरीता डॉक्टरांनी 'The Employment Exchange of Great Britain ह्या पुस्तकातील एक भाग वाचून दाखविला.
इंग्लंडमध्ये सार्वत्रिक युनियनला पूर्ण मान्यता आहे. निरनिराळ्या उद्योगधंद्यात असलेल्या कामगार लोकांना संघटित होऊन, एक युनियन स्थापन करता येते. सार्वत्रिक युनियनचे (९१९४३! ७१।०१) सभासद एकाच उद्योगधंद्यातील निरनिराळ्या उद्योगधंद्यात नोकरीला असतात. म्हणजे निरनिराळ्या उद्योगधंद्यात असलेल्या मजुरांना एकाच युनियनचे सभासद होता येते. कोणत्या प्रकारे मजुरांनी आपली संघटना करावी, हे इंग्लंडमध्ये मजुरांवरच सोपविलेले आहे. अशी स्थिती इंग्लंडसारख्या पुढारलेल्या राष्ट्रात असता हिंदुस्थानसारख्या मागासलेल्या राष्ट्राला अशा प्रकारच्या कायद्याची काय जरूरी आहे, हे मला समजत नाही.
यापुढील भाषण असलेले अंक उपलब्ध झाले नाहीत.-संपादक.