१४३
भांडवलदारांच्या कृपेवर श्रमजीवी
वर्गाचे कल्याण अशक्य
पूर्वी जाहीर झाल्याप्रमाणे गेल्या रविवारी, दिनांक १६ ऑक्टोबर १९३८ रोजी
सायंकाळी साडेसहा वाजता, मुंबईतील प्रमुख कामगार संस्थांच्या विद्यमाने, विशेषतः स्वतंत्र मजूर पक्ष व ट्रेड युनियन काँग्रेसतर्फे कामगारांची एक संयुक्त परिषद परळच्या कामगार मैदानावर भरली होती. या परिषदेचे अध्यक्षस्थान
बॅ. जमनादास मेहता यांनी स्वीकारले होते. मुंबई प्रांतिक असेंब्लीमध्ये काँग्रेस मंत्रिमंडळाने कामगारांच्या हितरक्षणाच्या नावाखाली जे ट्रेड डिस्प्यूट बिल मांडले आहे त्याचा निषेध करण्यासाठी ही ५० हजार कामगारांची प्रचंड परिषद भरली
होती. तसेच या परिषदेमध्ये तारीख ७ नोव्हेंबर १९३८ रोजी मुंबई इलाख्यात
एक दिवसाचा सार्वत्रिक संप पुकारून कामगारांचा या सरकारी बिलाला किती
तीव्र विरोध आहे हे जाहीररित्या सरकारच्या निदर्शनास आणण्याचा निश्चय
कामगारांनी या परिषदेमध्ये जाहीर केला. |
गेल्या रविवारी, या परिषदेच्या प्रचार कार्यासाठी काही कामगार व त्यांचे पुढारी
कामगारांच्या वस्तीतून मोटार लॉरीतून फिरत होते. घोडपदेवच्या बाजूने ही मोटार लॉरी जात असताना, आजूबाजूच्या माऱ्याच्या जागेचा आश्रय धरून काही
गुंडांनी कामगारांच्या लॉरीवर दगडफेक केली. या अवचित व बेसावधपणे
आलेल्या दगडधोंड्यांच्या माऱ्यात १०-१२ कामगारांना जबर दुखापती झाल्या.
त्यांचे रक्ताने माखलेले कपडे बॅ. मेहता यांनी सभेत सर्वाना दाखविले. त्यावेळी
कामगारांनी काँग्रेसच्या या गुंडगिरीचा जाहीररित्या निषेध केला. कॉंग्रेसच्या या
हिंसावादी वर्तनाचा कडक भाषेत बॅ. जमनादास मेहता यांनी आपल्या प्रास्ताविक
भाषणात समाचार घेतला.
यानंतर कॉ. मिरजकर यांनी ' ठरावाचा मसूदा वाचून दाखविल्यावर,
आमदार खेडगीकर, अँ. जोशी, शामराव परूळेकर, बी. टी. रणदिवे, जोगळेकर,
सौ. उषाबाई डांगे, ओक, पाटकर, कॉ. निमकर, जे. बुखारी, स्वतंत्र मजूर
पक्षाचे सेक्रेटरी भाई डी. व्ही. प्रधान, आमदार भोळे, मध्यप्रांताचे कामगार पुढारी
0 1101 हि
जनता : २२ आँक्टोबर १९३८.