भांडवलदारांच्या कृपेवर श्रमजीवी वर्गाचे कल्याण अशक्य २१७
' गुरूची विद्या गुरूस फळली ' या न्यायाने कामगारांना उपयोग करणे भाग पडले आहे. मी.आतापर्यंत या प्रश्नाचा शांतपणे विचार केला आहे, त्यावरून नुसत्या सार्वत्रिक संपाने, निषेधकारक प्रचंड सभांनी किंवा मिरवणुकींनी श्रमजीवी वर्गाच्या सर्वागीण उन्नतीच्या हितसंबंधाचा प्रश्न सोडविला जाईल, असे वाटत नाही. त्याहीपेक्षा काही अधिक कार्य केल्याशिवाय भागणार नाही,-ते कार्य करण्यासाठी कामगारांनी दुसऱया कोणत्याही पक्षाच्या छायेखाली आपली चळवळ चालविण्यापेक्षा अगदी स्वतंत्र पक्षाची स्थापना करणेच खरे हितावह आहे. माझे अनेक मित्र मला काँग्रेसमध्ये सामील होण्याचा कळकळीचा उपदेश करीत आहेत. परंतु आपला लढा स्वतःच्या पायावर उभारूनच लढविला पाहिजे. दुसऱ्याकडे भिक्षा मागून कुणाचा केव्हाही कार्यभाग होणार नाही. स्वतःची हिम्मत हीच खरी मार्गदर्शक असते आणि म्हणून भांडवलदारांच्या कपेवर जगणाऱ्या काँग्रेसच्या हातून श्रमजिवी वर्गाचे कधीही कल्याण होणार नाही. यासाठी कामगारांनी सारी राजकीय सत्ता काबीज करण्यासाठी स्वतंत्र
पक्षाच्या निशाणाखाली लढाऊ वृत्तीने लढणेच जरूरीचे आहे.