१६-१०-१९३८ भांडवलदारांच्या कृपेवर श्रमजीवी वर्गाचे कल्याण अशक्य - Page 257

माझी महात्माजीची भेट झाली तेव्हा- २१९

पहा. १९३२ साली विठ्ठलभाई पटेलांच्या हाताला हात लावून यांनी गांधींबद्दल

काय म्हटले होते ?

महात्मा गांधींनी कायदेभंगाची चळवळ तहकूंब केल्याचे ऐकून आश्‍चर्य

वाटले. म. गांधींनी आजपर्यंत राष्ट्राकडून झालेल्या भरीव कार्यावर लेखणीच्या

एका फटकाऱ्याने काळीमा फासला आहे. गेल्या १३ वर्षात विलक्षण स्वार्थत्याग

व आत्मयज्ञ करून हिंदी राष्ट्राने आपल्या चळवळीची कमावलेली किर्ती व इभ्रत

| महात्माजींच्या या चळवळ तहकुबीच्या खुलाशाने पार घालविली आहे. त्यांना ' अशा चळवळी मध्येच तहकूब ठेवण्याचा काय हक्क आहे हे अजूनही मला

समजलेले नाही. एकदा नेपोलियनने आय अँम दी स्टेट (8108888) असे उद्गार काढले होते. आज गांधी आय अॅम दी काँग्रेस (। am the Congress)

असे लोकांना अप्रत्यक्ष रीतीने सांगत आहेत. सविनय कायदेभंगाची चळवळ

तहकूब ठेवणे म्हणजे सध्याचा काँग्रेसचा कार्यक्रम अयशस्वी झाला अशी कबुली

देण्यासारखे आहे. महात्मा गांधी राजकीय पुढांरी या दृष्टीने अयशस्वी

ठरले आहेत असे आमचे व्यक्तिशः मत आहे. गांधींना अशा शिव्या देणारे हे

गृहस्थ आज राष्ट्रभक्त आहेत. हा कायापालट होण्याचे कारण त्यांनी मागाहून

पांघरलेली गांधी भक्तीची झूल. वर्गणीचे चार आणे आणि पांढऱ्या टोपीचे

दोन आणे खर्चून मी काँग्रेसमध्ये जाईन तर मी मागेन तो मान मला मिळेल

हे मला ठाऊक आहे. पण असला मान मी ठोकरेने उडवतो. मी गांधींचा

विरोध का करतो ? मी गांधींचा विरोध करतो तो माझ्या स्वार्थासाठी करीत

नाही. हा महात्मा विश्वासघातकी आहे म्हणून मी त्याला विरोध करतो. त्यांच्या

विश्वासघातकीपणाचा माझ्याजवळ भरपूर पुरावा आहे. त्याचा मला माझ्या

कार्यात प्रत्यक्ष अनुभवही आलेला आहे, म्हणून मी त्यांना विरोध करतो आणि

करीत राहीन. | |

गांधींना मी विश्वासघातकी का म्हणतो हे मी तुम्हाला सांगतो. राऊड

टेबल कॉन्फरन्ससाठी. हिंदुस्थानातील दलितवर्गाचा प्रतिनिधी म्हणून इंग्लंडला

जाण्यापूर्वी मी गांधींना भेटलो होतो. त्यावेळी ते म्हणाले होते की अस्पृश्यांना _

स्वतंत्र जागा देण्याच्या मी विरूद्ध आहे. तथापि, अधिक बोलणे झाल्यावर त्यांनी

कबूल केले की इतर अल्पसंख्य गटांच्या प्रतिनिधींनी अस्पृश्यांच्या मागण्या मान्य

केल्या तर आपण त्यांच्या आड येणार नाही. पुढे आम्ही विलायतेत

गेलो. दुसऱ्या वर्तुळ परिषदेला गांधीही आले. मी ज्या कामासाठी गेलो होतो

त्यासंबंधी चर्चा चालल्याच होत्या. एक दिवस सरोजिनीबाईंनी मला गांधींच्याकडे

नेले. त्यांना अस्पृश्यांचे म्हणणे काय आहे ते समजून घ्यांयचे होते. वेळ रात्री

१० ची होती. आम्ही पोचलो तेव्हा गांधी चरखा फिरवीत बसले होते. मला