माझी महात्माजीची भेट झाली तेव्हा- २२१
अल्पसंख्य समितीच्या सभेत वरील प्रकारचे भाषण केल्यानंतर या महात्म्याने काय केले असेल ? आपलाच हेका तडीस नेण्यासाठी त्यांनी आपल्या मते एक नामी युक्ती शोधून काढली. त्यांनी एक कुराणाची प्रत.मिळविली, तिची पाने चाळली आणि एक मनाशी ठरवून रिट्झ हॉटेलमध्ये ना. आगाखानांच्या मुक्कामी मुसलमानांची खाजगी सभा चालली होती तिथे ते गेले आणि कुराणाची प्रत त्यांच्यासमोर धरून ते म्हणाले, “ हे पहा तुमचा धर्मग्रंथ काय सांगतो. कोणत्याही समाजात फूट पाडणे पवित्र इस्लाम धर्माला विहित आहे काय ? “ ते म्हणाले ' नाही. ' गांधी म्हणाले, “ तर मग तुम्ही एक फार मोठे अधर्म्य कृत्य करीत नाही काय ? अस्पृश्यांच्या मागण्यांना मान्यता देऊन तुम्ही हिंदुसमाजात फूट पाडीत आहात हे तुमचे कृत्य इस्लाम धर्माच्या विरूद्ध आहे “ ते लोक म्हणाले,
“ पण गांधीजी, यात धर्माचा संबंध काय ? हा प्रश्न राजकीय हक्कांचा आहे. आम्ही अस्पृश्यांपेक्षा अधिक संपन्न, अधिक सुस्थित, अधिक प्रगत असून काही राजकीय हक्कांकरता झगडत आहो. आम्हाला आणि इतर अल्पसंख्य समाजांना जे हक्क मागण्याचा आणि मिळवण्याचा अधिकार आहे ते हक्क अस्पृश्यांना देणे रास्त आणि सरळ आहे. यात अधर्म्य ते काय?”
कुराणाच्या मागे दडून केलेला हा वार फुकट गेलेला पाहून गांधींनी दुसरा आणि अधिक बेशरम प्रयोग केला. ते म्हणाले, ' बरं असो. तुमच्या चौदा मागण्या तुम्हाला तर हव्या आहेत ना ?' ' अलबत. हव्या आहेत. ' मग मी त्या तुम्हाला मिळवून देतो. मात्र तुम्ही माझे काम केले पाहिजे. तुम्ही जर कमिटीच्या सभेत अस्पृश्यांच्या मागण्या नाकाराल तर मी तुमच्या चौदाच्या ` चौदा मागण्या स्वीकारल्या जातील असे करीन. |
अस्पृश्यांना काहीही द्यायचे नाही ही आपली बैठक धरून बसण्याकरिता हा महात्मा कोणत्या थरापर्यंत जाऊ शकतो हे पाहिल्यानंतर त्यांच्यावर कोणाचाही विश्वास बसेल काय ? मुसलमानांशी त्यांनी केलेल्या या कराराचा मसुदा
माझ्याजवळ आहे. तो मी माझ्या पुस्तकात प्रसिद्धही करणार आहे. मी
नुसत्या वाऱ्यावरच्या गोष्टी बोलत नाही.
माझ्यावरचा आणखी एक आरोप म्हणजे मी काँग्रेसला मिळत नाही. गोष्ट
खरी आहे. काँग्रेसला जाऊन मिळण्याने काय काय लाभ होतात याची थोडीशी
कल्पना मी दिली आहे. मी काँग्रेसला मिळावे यासाठी प्रयत्नही करण्यात आलेले
आहेत. त्यापैकी एकासंबंधी मी सांगतो. म्हणजे काँग्रेसला जाऊन मिळण्याचे
रहस्य काय असते ते तुम्हाला कळून येईल. १९३५ साली एकदा माझ्या एका