२२२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
मित्राने मला आग्रह करून गांधींकडे वर्ध्याला त्यांचा माझा सलोखा घडवून आणण्यासाठी नेले. मला माहीत होते की या जाण्याचा काही उपयोग होणार नाही. पण मित्राच्या भिडेखातर मी गेलो. * शेगावला गांधींची भेट झाली आणि माझाच अंदाज खरा ठरला. आम्ही परत वर्ध्याला शेठ जमनालालजीकडे आलो. त्याठिकाणी पुन्हा काही मंडळी माझे मन वळवण्याचा प्रयत्न करू लागली. जमनालालजी म्हणाले,--
““ देखो डॉक्टरसाब, आप बडी भूल कर रहे हो. *
मी म्हटले, “ ते कसे काय ?
ते म्हणाले. " पहा, काँग्रेसला येऊन मिळून तुमचे किती हित होईल ते. अस्पृश्योद्धाराची चळवळ आम्ही तुमच्या हाती देऊ. तुम्हाला माहिती आहे पूर्वी आमच्या मारवाडी समाजाबद्दल लोक काय म्हणत असत ? हे लोक समाजाच्या जळवा आहेत. कुळांच्या घरादारांवरून नांगर फिरवणारे, उलट्या काळजाचे बदमाश आहेत. पण आज ! आज मारवाडी राष्ट्रपुरुष आहेत. जिथे तिथे त्यांची शेखी आहे. याचे कारण काय ? याचे कारण आज आम्ही काँग्रेसला मिळालो आहो. तुम्ही काँग्रेसला मिळा. तुम्हीही राष्ट्रपुरूष
व्हाल. “
मी म्हटले ” हे कसे शक्य आहे ? माझा गांधींवर विश्वास नाही, त्यांच्या कार्यावर विश्वास नाही. माझे त्यांच्याशी मतभेद आहेत. मी काँग्रेसमध्ये येऊन त्यांच्याबरोबर कसे काम करणार ? "
यह कोई बडी बात नही. मतभेद असला म्हणून काय झाले ? जवाहरलाल नेहरू पहा. त्यांचेही गांधींशी मतभेद आहेत. पुष्कळ बाबतीत त्यांच्या झटपटीही होतात. पण ते मधूनमधून ' गांधी माझे गुरू आहेत ' असे म्हणत असतात. तसेच तुम्हीही केलेत म्हणजे झाले. फिर सब बात ठिक होयेगी. "
मी हसून म्हणालो, " एखाद्यावर आपला विश्वास असला म्हणजे मतभेद असला तरी त्यांच्याबरोबर काम करीत राहाता येते. पण माझा गांधींवर विश्वासच नाही. मग मधूनमधून तरी त्यांना गुरू कसे म्हणणार आणि त्यांच्याबरोबर काम कसे करणार ? "'
त्यावरच बोलणे थांबले. मग परत गांधींचा निरोप घ्यायला म्हणून आम्ही शेगावला गेलो. तिथे गेल्यावर मी पाहातो तो माझ्या आधीच : वर्ध्याच्या
* शेगाव हा सेवाग्रामसाठी आला आहे.