माझी महात्माजीची भेट झाली तेव्हा- २२३
संभाषणाची हकीकत शेगावला पोचलेली । मी तिथे पोचून गांधींच्या समोर जाताच महादेव देसाई गांधींना म्हणाले,--
““ खबर छे बापूजी, डॉक्टरसाहेब सूं कहे छे. “
““ काय ? काय म्हणतात ?” गांधीनी विचारले. गांधींच्या समोर मी माझे त्यांच्यासंबंधीचे [मत ] [सांगायला ] [कचरेन ] [असा ] [भाव ] [दाखवून ] महादेव देसाई म्हणाले,--
ते म्हणतात की तुमच्यावर त्यांचा विश्वास नाही म्हणून ते
तुमच्याबरोबर कार्य करायला तयार नाहीत
` गांधींनी माझ्याकडे प्रश्नार्थक दृष्टी टाकली. मी म्हणालो, “ खरे आहे अगदी. माझा तुमच्यावर मुळीच विश्वास नाही
आज काँग्रेस पेसेवाल्यांची मिंधी झालेली आहे आणि तिच्याकडून खरोखर
लोकहिताची कामे होणे अशक्य आहे. आजच्या परिस्थितीत काँग्रेसमध्ये शिरून कोणताही चढाईचा किंवा लढाईचा कार्यक्रम हाती घेता येणार नाही. म्हणून आपण तीत शिरत नाही. |