|
|
|
|
१४५
राजकारणात बोललेलं जेव्हाच्या तेव्हा
विसरलं पाहिजे
दिनांक २६ ऑक्टोबर १९३८ रोजी मध्यप्रांत वऱ्हाड प्रांतातील कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या राजगृहात भेटले होते. कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकल्यानंतर डॉ. आंबेडकरांनी कार्यकर्त्यांना उद्देशून जो हितोपदेश केला होता, तो खाली दिला आहे. .लेखक स्वतः त्या कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळात त्या प्रसंगी उपस्थित होते आणि डॉ. आंबेडकर जे काही बोलले ते लेखकाने नमूद करून ठेवले असल्यामुळे ते उद्धृत केले आहे.
कार्यकर्त्यांनी सकाळी ७ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भेट घेतली. त्यावेळी ते गंभीर व शांत दिसत होते. मुद्रेवर करारी बाणा दिसत होता. कार्यकर्त्यांबरोबर झालेल्या चर्चेनंतर आम्हाला उद्देशून ते बोलू लागले. त्यावेळी त्यांच्या भाषणातून कळकळीचे करारी उद्गार बाहेर पडताहेत असे आम्हास वाटत होते.
डॉ. आंबेडकर म्हणाले,
तुमच्या मध्यप्रांत वऱ्हांडच्या कौन्सिल इलेक्शनला जवळजवळ दीड वर्ष झाले. इतक्या दिवसात आपण काहीच करू शकलो नाही. तुम्हाला २० जागा मिळवून दिल्या. त्यापैकी फक्त ७ जागा मिळाल्या. १३ जागांचे काहीच करता आले नाही. सात माणसात सुद्धा कधी आपलेपणा दिसून आला नाही, कधीच एकीचा संबंध राहिला नाही. आमच्या मुंबईत पहाल तर आपल्या स्वतंत्र मजूर पक्षाचे काँग्रेसपेक्षाही उत्तम ऑर्गनायझेशन आहे. लोकजागृती आणि राजकारणातील संघटन हे दोन्ही कार्य निराळे.
इलेक्शन झाल्यानंतर आपण काय सभासद बनवले ? मागे मी केसच्या वेळेस आलो असताना चौकशी केली, तेव्हा पक्षाचे कोणी सभासद झाल्याची बातमी मिळाली नाही. तेथे स्वतंत्र मजूर पक्षाचे ऑफिस नाही. त्यात कोणी मनुष्य काही दाद मागण्याकरिता आला, त्याची काही तक्रार असेल, त्याची व्यवस्था करण्याची काहीच सोय नाही. तुमच्या जवळ पैसा नाही. पैशाशिवाय
विदर्भातील दलित चळवळीचा इतिहास : एच. एल. कोसारे पृ. ५१७, ५१८.