२३-१०-१९३८ माझी महात्माजींची भेट झाली तेव्हा - Page 263

राजकारणात बोललेलं जेव्हाच्या तेव्हा विसरलं पाहिजे २२५

॥ राजकारण कसं चालणार ! केवळ एखाद्या माणसावर पैशाकरिता अवलंबून है राहिल्याने राजकारण चालू शकत नाही. आम्ही जे सभासद केले आहेत त्यात $ बरेच कायम सभासंद आहेत, म्हणूनच राजकारण आहे. तुम्ही असं काहीच

केलेलं नाही आणि मी सांगतो ते तुम्ही काही करीत नाही. मी फक्त मुंबईची

जबाबदारी घेईल. मला मध्यप्रांत वऱ्हाडबद्दल काय करायचं आहे. तुम्हाला

॥ जर काही कार्य करायचं नाही तर मला तुमच्या प्रांताबद्दल काही कर्तव्य

नाही. तुमच्या प्रांतात काही स्वार्थी, काही गोड बोलणारेही आहेत. काही

कार्य करणारेही आहेत. परंतु आतापर्यंत काहीच झालं नाही, ते कार्य तुम्हास

केलं पाहिजे. तुम्हास कोणती तरी एक गोष्ट केलीच पाहिजे. एक तर मी

सांगतो त्याप्रमाणे केलं पाहिजे किंवा दुसरी गोष्ट मी जे केलं आहे त्याप्रमाणे वागलं

पाहिजे. भाई जयवंतला ऑर्गनायझर नेमलं आहे. तेव्हा त्यांच्याबरोबर

सहकार्य करून तुम्ही कार्य केलं पाहिजे. मग तुम्ही त्याला विरोध का

करावा ? आपल्यात एक दोष आहे की एकदा भांडण झालं की ते भांडण पिढ्या

न पिढ्या चालावं. राजकारणात बोललेलं जेव्हाच्या तेव्हा विसरलं

पाहिजे. हरदास बद्दल मला आदर आहे. परंतु त्यांच्यात काही दोषही

आहेत. हरदासने पाटलास तिकीट दिली नाही म्हणून पाटलांनीसुद्धा असं का rs क ie a] NT नन Cr ३० क य करायला नको. ।

आपण अल्पसंख्यांक लोक आहोत. बेडकी फुगली तरी बैलाएवढी होऊ

शकत नाही. तेव्हा कोणाच्या जोडीला जोड लावल्याशिवाय राजकारण आपल्या

हाती येऊ शकत नाही. पूर्वीची चळवळ आपल्या पुरतीच होती. आपणास

ब्रिटिश सरकारकडून त्यावेळेस मिळवायचं होतं. आता ब्रिटिश सरकार उरलं

नाही. आजचं राजकारण बहुमतानं चालणार आहे. बहुमत असल्याशिवाय

राजकारण आपण काबीज करू शकत नाही. करिता बहुमत वाढवलं

पाहिजे. जयवंतबद्दल एवढा बाऊ का करता ? जयवंत. काही कोणी राजा

नाही. कोणीही उत्तम कार्य करत असतील तर उत्तम आहे. जर कोणी विरुद्ध

कार्य करू लागले तर त्याला मी एका शब्दासरशी काढू शकेन. कोणीही

स्वतंत्र मजूर पक्षाचा सभासद असल्यावर दुसऱ्या कोणत्याही राजकीय पक्षाचा

सभासद राहू शकत नाही. राजकारणाशिवाय समाजकार्य, धर्मकार्य वगैरे करू

शकतात. अधिकारावर कोणी राहावं हे ठरवणं लोकांचं कर्तव्य आहे. सभासदांवर देखरेख करणारा लायक मनुष्य नाही म्हणून असा गोंधळ होत असावा. माझ्या

हातून जर काही कमी जास्त झालं तर मला येथील लोक विचारावयास येतात.

सत्याग्रह आपण करतो तो ज्या मनुष्यावर आपलं प्रेम आहे त्या विरूद्ध. मूल

आईच्या विरूद्ध सत्याग्रह करते. डॉ. खरे यांच्या कडून मी कबूली जबाब लिहून

घेतला आहे. ” हे लोक (अस्पृश्य) अज्ञानी आहेत. त्यांना महत्त्वाकांक्षा

नाहीत. मला, अस्पृश्य मिनिस्टर घेतला असता, का घेतला ? व एक मिनिस्टर

घेऊन त्यांच्या मनात तुम्ही महत्त्वाकांक्षा उत्पन्न केली.” असे म. गांधी म्हणाले.