२६-१०-१९३८ राजकारणात बोललेलं जेव्हाच्या तेव्हा विसरलं पाहिजे - Page 264

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे २२६

थोडा तरी तुम्ही सत्याग्रह केला होता त्यावेळेस अग्निभोज याने

होता काय ? तो जर केवळ आपल्या हक्काकरिता भांडायला तयार नाही तुम्ही गांधींविरूद्ध सत्याग्रह का केला ? जो मनुष्य भांडायला तयार आहे त्याच्याकरिता भांडायला तयार होणं हे कर्तव्य ठरतं. |

तेथे जे स्वतंत्र मजूर पक्षाचे कार्य करण्यात येईल त्या ब्रॅचवर हेड कंट्रोल असायला पाहिजे. मी शिस्तीचा भोक्ता आहे आणि मी जवळ जवळ प्रकारचा डिक्टेटर आहे. पैशाच्या बाबतीत आपण अत्यंत प्रामाणिक असलं

पाहिजे. | |

दरेक जिल्ह्याचे पाच पाच सभासद आणून त्यांची सभा घ्या. त्यात सातही एम. एल. ए. लोकांना बोलवा व सर्वामिळून स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन करा.

काँग्रेस ही भरभक्कम पायावर उभारलेली संस्था आहे. त्यापुढे आपले काहीच चालत नाही. त्यांचे बहुमत असल्यामुळे आपणास काहीच करता येत नाही. म्हणून त्यांच्यात फूट पाडणं आपलं कर्तव्य आहे. डॉ. खरे हा शत्रु पक्षाचा एक दगड आहे. तो पाडण्याचा मी प्रयत्न केला.

पक्षाच्या सभासदांचे पैसे एका माणसाजवळ ठेवू नये. पैसा दोन किंवा पाच माणसांच्या नावाने बँकेत ठेवायला पाहिजे. पक्षाच्या कामाकरिता एक सेक्रेटरी नेमा । (हे काम तर झालंय) ऑफिस करिता एक घर. घ्या. जो फॉर्म आहे त्यावर महिन्यास जी वर्गणी होईल ती लिहून पाठवा. तुम्ही सुरळीत कार्य सुरू केलं की जनता पत्रात सी. पी. व बेरार करिता दोन पाने रिझर्व ठेवू. आताची एक तात्पुरती कमेटी नेमा आणि नंतर इलेक्शन होईल. प्रचारकाच्या

कामाकरिता निरनिराळ्या लोकांकडे निरनिराळे विभाग द्यावे. स्वतंत्र मजूर पक्षाच्या राजकारणाकरिता सभासद जास्त वाढवून संघटन करणं अत्यंत आवश्यक आहे.

ज्या माणसाच्या हाती सत्ता जाते तो मनुष्य उत्तम निवडून दिला पाहिजे. समाजकार्य कशात आहे, समाजाचे हित कशात आहे, कोणत्या गोष्टीची समाजाकरिता आवश्यकता आहे, ही जाणीव त्याला असली पाहिजे. कार्य करणारे अवल दर्जाचे लोक निवडून न देता त्या ठिकाणी जर कोणी आपले नातलग म्हणून भरती करू लागले तर काहीही कार्य होणार नाही. जाहीर सभेत आपल्या मनुष्याबद्दल मतभेद जरी असला तरी सुद्धा आपला पक्ष लंगडा पडू शकणार नाही असं प्रत्येक सभासदाचं वर्तन असलं पाहिजे.

पक्षाचे सभासद बनवा व एक मध्य प्रांताचा नकाशा काढून मला पाठवा. त्या नकाशात जिल्ह्या जिल्ह्याचे विभाग दाखवून त्यात आपले मतदार किती व सर्वसाधारण मतदार किती, कोठे जागा रिझर्व आहेत व कोणत्या ठिकाणी इलेक्शन लढवावे लागतात, ही सर्व माहिती त्यात भरून मला पाठवा, म्हणजे पुढील व्यवस्था कशा तऱ्हेची असावी हे ठरवावयास अगदी सुलभ जाईल.

७७७