२६-१०-१९३८ राजकारणात बोललेलं जेव्हाच्या तेव्हा विसरलं पाहिजे - Page 265

१४६
मालक-मजूर तंटा निवारण कायदा,
मजुरांच्या माना कापणारा

रविवार ता. ६ नोव्हेंबर १९३८ रोजी संध्याकाळी परळच्या कामगार मैदानावर

एक लाखापेक्षा अधिक अशा जमावाने कामगार जाहीर सभेला हजर होते. ही कामगारांची विराट सभा पाहाणारांची आधीच खात्री झाली होती की [तारीख ] ७ नोव्हेंबरचा कामगारांचा एक दिवसाचा [सार्वत्रिक ] [संप ] [पूर्णपणे ] [यशस्वी ] होणार. त्या दिवशी सभेचे अध्यक्ष बॅ. जमनादास [मेहता ] [तसेच ] [शामराव ] परूळेकर, भाई याज्ञिक, एस. ए. [डांगे, ] मिरजकर [यांची ] [भाषणे ] [झाली. ] त्या सभेतील विराट जनसमुहापुढे भाषण करताना [डॉ. ] [बाबासाहेब ] [आंबेडकर ] [म्हणाले, ]

आज आपण या ठिकाणी मुंबई सरकारने लेजिस्लेटिव्ह [असेंब्लीत ] [' ] [ट्रेड ]

डिस्प्यूट बिल [' ] या नावाचे [जे ] [बील ] [आणले ] [आहे ] [त्याचा ] [निषेध ] [करण्याकरिता ] [जमलो ] आहो, हे आता माझ्या पूर्वीच्या [वक्त्यांनी ] [आपणास ] [सांगितले ] [आहेच. ] या बिलाला ' ट्रेड डिस्प्यूट बिल [' ] अथवा [' ] [मालक ] [मजूर ] [तंटा ] [निवारण्याचा ] [कायदा ] [' ] [असे ] संबोधण्यात येत आहे. या बिलाने कामगार वर्गाची [मान ] [किती ] [सफाईदार ] [रीतीने ] कापली गेली आहे, याची [चर्चा ] [मी ] आता करीत नाही. कारण ही चर्चा माझ्या पूर्वीच्या वक्त्यांनी व असेंब्लीतील [आपल्या ] [सभासदांनी ] [गेले ] [दोन ] [अडीच ] [महिने ] अखंड उत्साहाने आणि [कर्तव्य ] [तत्परतेने ] [केलेली ] [आहे. ] आपण ती वर्तमानपत्रात वाचलेली आहे. आज मला आपणाला [एवढेच ] [सांगावयाचे ] [आहे ] [की, ] [काँग्रेस ] सरकार अधिकारावर [आल्यावर ] [मजुरांच्या ] [संबंधाने ] [इतका ] [अन्याय ] [कायदा ] [संख्या ] बळाच्या जोरावर [पास ] [करून ] [घेऊन ] [त्या ] [अन्यायांचा ] [परिस्फोट ] [करणारांविरूद्ध ] खोटानाटा, निंद्य आणि [बेशरमपणाचा ] [प्रचार ] [करण्याइतकी ] [काँग्रेसची ] [सत्य-अहिसा ] वृत्ती आज अधोगतीला [गेली ] [आहे, ] [ही ] [गोष्ट ] [आपणाला ] [विसरता ] [येणार ] [नाही. ]

' मजुरांचे पुढारी स्वार्थसाधू आणि लबाड आहेत ' असे हवे त्या उपऱ्या भाडोत्री 'खादीवाल्यापासून तो थेट पट्टीच्या कांग्रेस जंबुकापर्यंत सर्वांनी खुशाल बरळत सुटावे ! मी तुमच्यापुढे आज स्पष्ट सवाल टाकतो की, पूर्वी १९३०-३४ साली काँग्रेसने मजुरांच्या हितसंबंधाचे धोरण स्पष्ट जाहीर केले असता त्याला मूठमाती देऊन मजुरांच्या माना कापणारा कायदा तयार करणारे काँग्रेसचे पुढारी लबाड की सत्तामदांध काँग्रेस पक्षाकडून होणारा अपमान सहन करून कामगारांची बाजू

जनता : १२ नोव्हेंबर १९३८.