६-११-१९३८ मालक-मजूर तंटा निवारण कायदा, मजुरांच्या माना कापणारा - Page 267

मालक-मजूर तंटा निवारण कायदा, मजुरांच्या माना कापणारा २२९

आपण सर्वांनी संपात भाग घ्यावा आणि तो यशस्वी करून दाखवावा, अशी माझी इच्छा आहे. परंतु मी सांगतो अथवा इतर मजूर पुढारी सांगतात म्हणून आपण या संपात सामील व्हावे, असे मला वाटत नाही. ज्या बिलाविरूद्ध निषेध म्हणून हा संप पुकारला जात आहे त्या बिलाचे हिडीस स्वरूप आणि त्यासंबंधीचे आपले कर्तव्य यांचा मनोमन विचार करून संपात जाणे योग्य वाटले तरच आपण संपात सामील व्हावे, असे माझे आपणास सांगणे आहे.

उद्याचा संप यशस्वीरीतीने पार पडला म्हणजे संपले, असे मात्र समजू नका. तुम्हाला पुढे झगडाव्या लागणाऱ्या झगड्यांपैकी एकाची ही मुहूर्तमेढ

आहे, हे ध्यानात असू द्या. आपण हजारोंनी या सभेला हजर राहिल्याबद्दल

आपल्याला धन्यवाद देऊन मी आपली रजा घेतो.

डॉ. बाबासाहेबांनी सार्वत्रिक संपाबाबत केलेले भाषण कामगारांच्या मनावर

पूर्णपणे बिंबलेले दिसत होते. इतक्या दिवसांच्या प्रचारकार्याने कामगारांची

एकजूट अपूर्व अशी झालेली दिसत होती.

सभेनंतर कामगारांची, प्रत्येक कांमगार मोहल्ल्यातून वरळीपर्यंत निघालेली

प्रचंड मिरवणूक संपाच्या यशाची खात्री पटवीत होती. ही रात्रीची हजारो

कामगारांची मिरवणूक इतक्या शिस्तीने आणि शांततेने चालली होती की तिचे

कोणीही कौतुकच केले असते. संपाच्या प्रचारार्थ एवढी मोठी मिरवणूक पूर्वी

कधीच निधाली नव्हती. या मिरवणूकीची स्वतंत्र मजूर पक्षाच्या समता सैनिक

दलाने ठेवलेली शिस्त विशेष अभिनंदनीय होती. स्वतंत्र मजूर पक्षाच्या

कार्यकर्त्यांनी ट्रेड युनियन काँग्रेसच्या सहकार्याने संप यशस्वी करण्याची

जबाबदारी पार पाडण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा करणे शक्तीबाहेर

आहे. संपाच्या रात्री सर्व कामगार पुढारी संपाची जय्यत तयारी करीत

होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बॅ. जमनादास मेहता, डी, व्ही. प्रधान, डांगे,

निमकर वगैरे मंडळी रात्रभर कामगार विभागातून फिरत होते.

© ७० ७