६-११-१९३८ मालक-मजूर तंटा निवारण कायदा, मजुरांच्या माना कापणारा - Page 268

१४७

कोणत्याही परिस्थितीत मजुरांच्या प्रतिनिधींना
निवडून दिले पाहिजे

ता. ७ नोव्हेंबर १९३८ रोजीच्या मुंबई कामगारांचा प्रचंड संप यशस्वीरित्या पार

पडल्यानंतर दीड लाख कामगारांची कामगार मैदानावर संध्याकाळी सभा

झाली. कामगारांनी संपापासून कोणता धडा शिकावा व या पुढचे आपले

ताबडतोबीचे धोरण काय असावे व प्रत्यक्ष लढ्याच्या जोडीला कामगारांचे संप,

लढे व स्वातंत्र्याचा लढा यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता, कायदे कौन्सिले,

म्युनिसिपालट्या, लोकल बोर्ड वगैरे ज्या ज्या ठिकाणी म्हणून जी काही राजकीय

सत्ता आहे ती कामगारांच्या, शेतकऱ्यांच्या व जनतेच्या खऱ्याखुऱ्या प्रतिनिधींच्या

हाती येणे किती आवश्यक आहे, हे डॉ. आंबेडकरांनी आपल्या मुद्देसूद व सडेतोड

भाषणात समजाऊन दिले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,

आजच्या सायंकाळच्या वर्तमानपत्रांत काय आहे ते पाहा. म्हणजे विचित्र

लीला दिसून येईल. त्या वर्तमानपत्रात ज्या हकीकती प्रसिद्ध झाल्या त्या

आश्चर्यजनक आहेत. एक म्हणतो, मजुरांचा संप यशस्वी झाला नाही आणि

सर्व मजूर कामावर आहेत. ही गोष्ट खरी की खोटी मी सांगत नाही. मात्र मुंबईतील वर्तमानपत्रे मुंबई मंत्रीमंडळ व भांडवलदार यांनी विकत घेतली आहेत. असे दिसून येईल. अत्यंत यशस्वी संप झाला असताना असली खोटी व विपर्यस्त परिस्थिती चितारावी हे निषेधार्ह आहे. काय लिहून आले याची तुम्ही चिंता करू नका. समोर काय आहे ते पाहा व धीर धरा.

आज तुम्ही सव्वालाख कामगारांनी एकत्र येऊन पोटाची फिकीर न करता

रोजची कमाई बुडवून या बिलाला असलेला विरोध दाखवून दिलेला आहे. काँग्रेसने जो कायदा केला त्याला आपण विरोध केला. या बिलाला वरच्या कौन्सिलमध्ये देखील असाच विरोध माझे मित्र अँ. जोशी करणार असले तरी त्यांना मदत नाही. म्हणून हा कायदा आपल्या छातीवर बसणार. काँग्रेसने हा कायदा करावा आणि आपण विरोध करावा, हेच आपण करणार काय ? जर नुसते बावटे फडकवाल, स्लोगन्स ओरडाल आणि स्वस्थ बसाल तर तुमच्यासारखे महामूर्ख दुसरे कोणीही नाहीत, असेच मी म्हणेन. ज्या काँग्रेस सरकारने कक ल्ला त कह त जनता : १२ नोव्हेंबर १९३८.