कोणत्याही परिस्थितीत मजुरांच्या प्रतिनिधींना निवडून दिले पाहिजे २३१
घोड्यावर बसून आपल्या तोंडात लगाम घातला त्या काँग्रेस सरकारला उडवून देणे हे शहाणपणाचे आहे. शत्रुच्या हाती कायदा करण्याची जरादेखील संधी देऊ नका, जर आपण शहाणपणा अगोदर पाळला असता, अधिक मजूर पुढारी निवडून दिले असते तर हा कायदा पास झाला नसता. आज काँग्रेसचे मताधिक्य आहे. म्हणूनच हा कायदा काँग्रेस पास करू शकेल. आज जेथे सत्ता आहे ती जागा काबीज केली तरच तुमचा बचाव होईल.
म्युनिसीपालिटी, लोकल बोर्ड, कायदे कौन्सिले जेथे जेथे राजकीय सत्ता आहे,
ती सर्व स्थाने मजुरांनी काबीज केली तर आजचा कार्यक्रम यशस्वी झाला,
असे म्हणता येईल.
| येत्या म्युनिसीपल निवडणुकीत मजूर पक्षाचे पुढारी उभे राहाणार ` आहेत. त्यांनाच तुम्ही आपली मते द्या. काँग्रेसने गेल्या ५० वर्षात जी अब्रू
कमाविली ती गेल्या १५ महिन्यात घालविली आहे.
काँग्रेसने आज खरोखरच साम्राज्यशाही विरुद्ध निकराचा लढा सुरु केला तर
मी स्वातंत्र्याकरिता माझी सर्व शक्ती काँग्रेसच्याच बाजूला टाकीन. परंतु
काँग्रेसची आजची साम्राज्यशाही विरोधाची भाषा जनतेची शुद्ध दिशाभूल
करण्याकरिताच वापरली जात आहे. परंतू मी अजूनही असे सांगतो की जर
खरोखरच मला असे आढळून आले की कॉँग्रेस आज प्रामाणिकपणे स्वातंत्र्याकरिता
युद्ध करीत आहे तर मी माझी आजची भूमिका सोडून काँग्रेसला स्वातंत्र्याच्या
लढ्यात पाठिंबा देण्यास तयार आहे.
आणि म्हणूनच मी तुम्हाला परत असे सांगतो की तुम्ही कोणत्याही निवडणुकीत
मजुरांच्याच प्रतिनिधींना निवडून दिले पाहिजे. सरकारने कायदा करावा आणि
तुम्ही त्याला नुसता विरोध प्रदर्शित करावा हा काही खरा लढा नव्हे. तुम्हाला
नको असणारे, तुमच्या अहिताचे कायदे करणाऱ्या काँग्रेसवाल्यांना तुम्ही का
निवडून देता ? मुंबई म्युनिसीपालिटीच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. या
निवडणुकीत तुम्ही वाटेल त्याला मते द्या पण काँग्रेसला मते देऊ नका. असे
न केलेत तर.तुमचा लढा योग्य मार्गाने जाणार नाही, हे लक्षात ठेवा.