७-११-१९३८ कोणत्याही परिस्थितीत मजुरांच्या प्रति- निधींना निवडून दिले पाहिजे - Page 270

१४८

स्वतंत्र मजूर पक्षाचा प्रभाव

रविवार ता. ३ डिसेंबर १९३८* रोजी रात्रौ १० वाजता मुंबई फोरास रोड

म्युनिसीपल सिमेन्ट चाळ नं. १८ येथील मंडळीच्या विद्यमाने लोकाग्रणी आणि

मजूरांचे नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अध्यक्षतेखाली इमारत फंडाला मदत

देण्याकरिता जंगी जाहीर सभा घेण्यात आलेली होती. सदर प्रसंगी मेसर्स प्रि. दोंदे, के. व्ही. चित्रे, भाई प्रधान, आमदार डी.जी. जाधव, सी. एन. मोहिते, दादासाहेब गायकवाड, टी. एम. गुंडेकर, मडके बुवा, रेवजी डोळस, एस. पी. धोत्रे, वडवलकर आणि केशवराव आडेकर वगैरे सद्गृहस्थ उपस्थित होते. लोक समुदाय तीन; चार हजारावर होता. बरोबर १० वाजता नियोजित अध्यक्ष बाबासाहेब आणि इतर युरोपियन पाहुणे मंडळी यांचे सभास्थानी आगमन होताच लोकांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे हार्दिक स्वागत केले. नंतर | सी. एन. मोहिते मास्तर नियोजित अध्यक्षाची सूचना आणण्यास उभे राहिले. त्यांनी इमारतीची किती आवश्यकता आहे हे लोकास समजाऊन सांगितले. फोरास ' रोड म्युनिसीपल चाळ नं. १८ येथील हेल्थ डिपार्टमेन्ट मधील काम करणाऱ्या लोकांकडून आज २३५ रूपये रोकड जमा करण्यात .आलेले आहेत हे विशेष होय. तद्नंतर के. डी. शिर्के यांनी अनुमोदन दिल्यावर बाबासाहेब अध्यक्षस्थानी स्थानापन्न झाले. प्रथम मडके बुवा, रेवजी डोळस आणि प्रि. दोंदे साहेब यांची समयोचित भाषणे झाली.

मग डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे बोलावयास उभे राहिले. त्यांनी बायबल मधील जुन्या करारातील ज्यू लोकांची हृदयविदारक व गुलामगिरीची कहाणी सांगितली. तीत ज्यू लोकांची गुलामगिरी व अस्पृश्यांची परिस्थिती यांच्यात किती फरक आहे. हे समजाऊन सांगितले. नंतर महाडच्या सत्याग्रहापासून आजतागायतच्या सामाजिक व राजकीय परिस्थितीचे सिंहावलोकन केले. इमारत फंडासंबंधी बोलताना ते म्हणाले, प्रत्येक चाळीतील लोकांनी आपल्यातर्फे पाच माणसांची कमिटी नेमून चाळीतील अठरा वर्षावरील स्त्री, पुरूषांची खानेसुमारी करावी. म्हणजे त्या चाळीतील लोकांकडून किती रुपये मिळाले पाहिजेत हे

MN MTEC ENN

जनता : १० डिसेंबर १९३८.

* तारीख ४ डिसेंबर १९३८ असावी--संपादक.