स्वतंत्र मजूर पक्षाचा प्रभाव २३३
मला समजेल. प्रत्येक मनुष्याने व्यक्तीशः १ रुपया पेक्षा अधिक आपल्या ऐपती-
` प्रमाणे पैसे द्यावेत. मुंबई स्कूल कमिटी खात्यातील प्रत्येक शिक्षकाकडून अर्धा पगार घेणार आहे. आज आपल्या कार्याचा व्याप जास्त प्रमाणात वाढल्यामुळे समाज व राजकारण यांची सूत्रे हलविण्याकरता स्वतःची इमारत असणे अत्यंत
आवश्यक होय. आता दुसरी गोष्ट म्हणजे येती म्युनिसीपल निवडणूक
होय. मी स्वतंत्र मजूर पक्षातर्फे सध्या नऊ उमेदवार उभे केलेले आहेत. त्यांना आपली सर्व मते देऊन निवडून आणले पाहिजे. सर्व राजकीय पक्ष काँग्रेसपुढे अगदी फिके पडलेले आहेत. काही नामशेष झालेले आहेत. पण आज एकटा स्वतंत्र मजूर पक्ष काँग्रेस विरोधी म्हणून उभा राहिलेला आहे. हा पक्ष गोरगरीब मजूरांचा आहे. तेव्हा तो पक्ष या म्युनिसीपल इलेक्शनमध्ये पूर्ण यशस्वी झाला पाहिजे. बरे असो. ज्या लोकांनी इमारत फंडालां २३५ रुपये दिले त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. इमारत फंडाला वर्गणी देणाऱ्यांची नावे जनता पत्रातून प्रसिद्ध करण्यात येतील. याप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुमारे २
तास अस्खलित, कळकळीने आणि अधिकार वाणीने भाषण केले. नंतर मोहिते मास्तर यांनी अध्यक्षांचे, जमलेल्या मंडळींचे आभार मानल्यानंतर पुष्पहार अर्पण
करण्यात आले. साडेबारा वाजता सभेचे काम बरखास्त करण्यात आले. नंतर
श्री. करडकर यांच्या जलशाचा कार्यक्रम करण्यात आला. हा इमारत फडाचा
समारंभ घडवून आणण्यात श्री. राजाराम हिराजी माटवणकर आणि कृष्णा काळू
कुंभवडेकर यांनी अतिशय मेहेनत घेतली. तसेच गंगाबाई सातारकर यांनी सुद्धा
कार्य पार पाडण्यात मदत केली.