१४९
माझ्या पुस्तकाला बेलिफाने हात लावला तर
त्याला गोळी घालून ठार करीन
मुंबई येथे अस्पृश्य विद्यार्थ्यांतर्फे भरविण्यात येणारे “ मुंबई अस्पृश्य विद्यार्थी संमेलन “ तारीख १०, ११, १२ डिसेंबर १९३८ या तीन दिवशी अगदी यशस्वी रीतीने पार पडले. संमेलनाच्या अध्यक्षपदावरून सोमवार तारीख १२ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विद्यार्थ्यांना उपदेश केला. टाळ्यांच्या कडकडाटात आणि स्त्रियांच्या गॅलरीतून विद्यार्थिनीकडून होणाऱ्या पुष्पवृष्टीमध्ये डॉ. बाबासाहेब भाषण करावयास उठले. ते म्हणाले,
आज तुम्ही मुंबईमध्ये अस्पृश्य विद्यार्थ्याचे संमेलन घडवून आणले. आहे आणि
ते सर्व परीने यशस्वी झाले आहे. या कार्यक्रमाबद्दल तुमचे व ज्या विद्यार्थ्यानी हे संमेलन पार पाडण्यात भाग घेतला आहे, त्यांचे मी अभिनंदन करतो. मी शनिवारी व रविवारी नाशिकला होतो. प्रवासातील दगदगीमुळे माझी प्रकृती बिघडली आहे. माझ्यात काही त्राण नाही व भाषण करण्याची ताकद नाही. मी इतके सांगू इच्छितो की आजच्या प्रसंगी हजर राहता आले याबद्दल मला आनंद व धन्यता वाटते.
अशाप्रकारची संमेलने फार होतात. त्याप्रसंगी कोणी अध्यक्ष आला-मी नेहमी पाहतो-त्याने भाषण केले की त्यात विद्यार्थ्यांना एक टोमणा मारलेला असतो. तुम्ही शिकून काय करणार ? सरकारी नोकरी ? त्यांना देशसेवा करण्याचाही उपदेश करण्यात येतो. पण यात काही हशील नाही, विद्यार्थ्यासंबंधी मी जो काही विचार केला आहे त्यावरून मी असे सांगू इच्छितो की हा उपदेश खोटा आहे आणि मी तसाच उपदेश करणार नाही. विद्यार्थ्याने शिकून नोकरी केली तर त्यात काय पाप ? त्याला आयुष्य आहे, त्याला भावना आहेत. प्रत्येक मनुष्याचे अंतिम ध्येय काय आहे ? आपल्या अंगी वसत असलेल्या गुणांचा परिपोष होऊन त्यास गोड फळे यावीत, हेच ध्येय आहे. म्हणून मी तुम्हाला तो उपदेश करीत नाही. तुम्ही सरकारी नोकऱ्या मिळविण्याचा आटोकाट प्रयत्न करा. मला असा अनुभव आला आहे की, सरकारी नोकरी हल्ली एका जातीचा मक्ताच होऊन बसली आहे. कलेक्टर ऑफिसात किंवा इतर प्रत्येक ऑफिसात एकाच जातीची माणसे आहेत. पुष्कळ माणसे सांगतात, तुम्ही नोकरीसाठी का भांडता? लायकी असली की
जनता : १७ डिसेंबर, १९३८.