३-१२-१९३८ स्वतंत्र मजूर पक्षाचा प्रभाव - Page 273

माझ्या पुस्तकाला बेलिफाने हात लावला . . . . ठार करीन २३५

नौकरी मिळते, त्यात जातीचा कशाला प्रश्‍न ? परंतु आपल्या सामाजिक एरिस्थितीचा विचार केल्यास नोकरी केल्यावर काय फायदा आहे, असे विचारणे मुर्खपणाचे आहे. या देशात जातिभेदाचे प्रस्थ फार आहे. आज

हा ज्याच्याजवळ पैसा आहे त्याच्याच हाती खरी सत्ता आहे. तो तिचा सद्भावनेने

प्रयोग न करता आपल्याच पोळीवर तूप ओढून घेतो. नोकरीमुळे पगार हातात यैतो. ज्या समाजाला सरकारी नोकऱ्या नाहीत, जो समाज अधिकाराच्या . ज्ञागेवर नाही, त्याची ऊजितावस्था होणार नाही. ब्राह्मणसमाज सरकारी

नौकरीत गुंतलेला आहे. त्यामुळे त्यात सामर्थ्य आहे व तो आपले वर्चस्व गाजवू

शकतो. म्हणून तुम्ही सरकारी नोकऱ्या मिळविण्याचा पिच्छा पुरविल्यामुळे

समाजाची उन्नती होईल. याचा तुम्ही कसोशीने प्रयत्न करा.

` शिकलेल्या माणसात काही दोष असतात-शिकल्यावर नोकरीच्या पाठीमागे

लागणे हा दोष नव्हे-ते दोष व ते अवगुण तुमच्या अंगात शिरणार नाहीत याची

ख़बरदारी घ्या. पहिली गोष्ट शिक्षण पुरे झाल्यावर मनुष्य स्वार्थी बनतो. मनुष्य

स्वार्थी असणे हे स्वाभाविकच आहे. परंतु शिकलेला मनुष्य स्वतःचे हित

पाहतो, समाजाचे पाहात नाही. तो आपल्या बायको-पोरांची व स्वत:च्या

हिताचीच काळजी घेतो. मॅझिनी म्हणतो की “ लोकात पारतंत्र्य पसरले, माणसे

शिकली तरी त्यांच्यात कर्तव्यापेक्षा हक्कांची जाणीव जास्त उत्पन्न होते “ आपले कर्तव्य कोणते, याची भावना जागृत होत नाही हा एक शिकलेल्या माणसाचा दोष

आहे.

मला खेद वाटतो की शिकलेल्या मनुष्यास पदवी मिळाली आणि त्याला नोकरी

लागली की त्याचा विद्यार्जनाचा मार्ग साफ तुटतो. विद्येचे महत्त्व खुंटले

जाते. मी प्रवास करीत असता मजजवळ नेहमी चार पुस्तके व वर्तमानपत्र

असतात. परंतु प्रवासात जी शिकलेली माणसे दिसतात त्यांच्या हातात पुस्तके,

वर्तमानपत्रे यांच्याऐवजी सिगारेटच्या पेट्या मात्र दिसतात, मनुष्य बी. ए.

झाला म्हणजे त्याला अधिक शिक्षणाची गरज नाही काय ? बी. ए. किवा

एम्‌. ए. झाला म्हणजे त्याने सर्व ज्ञान संपादन केले, ही भावना -चुकीची

आहे. अगस्ती मुनीने ज्याप्रमाणे समुद्र प्राशन केला त्याप्रमाणे शिकून एखादी

पदवी मिळाली म्हणजे आपण सर्व विद्या हस्तगत केली असे शिकलेल्या लोकांना

वाटते ! बडोदे संस्थानात एक गृहस्थ होता. तो बी. ए. झाला

होता. महाराजांनी त्याची नेमणूक एका खेडेगावात केली होती. त्यावेळी

बडोदे संस्थानचे दप्तर गुजरातीतून चालत असे, इंग्रजीतून चालत नसे. मनुष्य

फार आळशी ! कधी चूकून टाईम्सदेखील वाचीत नसे. याचा परिणाम असा

झाला की काही वर्षानंतर त्यास ए. बी. सी. ची देखील ओळख राहिली नाही. हे

अगदी सत्य आहे. माझासुद्धा असाच अनुभव आहे. पीएच. डी. ही पदवी

मिळविण्याकरिता फ्रेंच व जर्मन भाषा अवगत करण्याचा निर्बंध असे. त्यावेळी

त्या माषा मला अवगत होत्या. परंतु आता त्या भाषांचा व्यासंग नसल्यामुळे त्या

a