१२-१२-१९३८ माझ्या पुस्तकाला बेलिफाने हात लावला तर त्याला गोळी घालून ठार करीन - Page 275

माझ्या पुस्तकाला बेलिफाने हात लावला . . . . ठार करीन २३७

तुमच्यापैकी बहुतेक अविवाहित असतील. कित्येकांची लग्नेही झालेली

असतील. पण लग्नानंतर तुम्ही काय करणार आहात ? या बाबतीत तुम्हावर

फार मोठी जबाबदारी आहे. मी तुमच्या वडिलांचे उदाहरण न घेता माझ्याच वडिलांचे उदाहरण घेतो. त्यांना एकंदर चौदा मुले झाली आणि त्यातले मी चौदावे रत्न. परंतु मी एलफिन्स्टन कॉलेजमध्ये असताना माझी काय दशा होती ? माझ्या पायात वहाणा नव्हत्या ! अंगात माजरपाटाचे शर्ट आणि

वडिलांचे फाटके कोट !! तुम्ही एलफिन्स्टन कॉलेजात गेलात म्हणजे तुम्हाला

तेथे मुल्लर साहेबांची तसबीर दिसेल. त्यांनी मला शेवटच्या दोन वर्षात शर्द्स्‌ | पुरविली. मी विचार करीत असे, माझ्या वडिलांना चौदा ऐवजी चारच मुले असती तर माझी किती चंगळ झाली असती. माझ्या या दुःखाला माझे वडिलच कारणीभूत होते. एकदा मी कॉलेजमध्ये जात असता रेल्वेचा पास घरी विसरलो आणि त्याच दिवशी पासाची तपासणी होती. तिकीट घेणाऱ्या मास्तरने मला अडविले. जवळ तर दिडकी नव्हती. चार वाजेपर्यंत चर्चगेटच्या स्टेशनावर बसून राहिलो होतो. नंतर कैकिणी नावाचा माझ्या वर्गातील विद्यार्थी तेथे

आला. त्याने विचारले ; ' काय रे, येथे का बसलाय ?' मी त्याला सर्व

हकीगत सांगितली. त्याने चार आणे भरून माझी सुटका केली व त्याच पैशाने

तिकीट काढून त्याने मला घरी पाठवून दिले. तेव्हा या बाबतीत मी माझ्या

वडिलांना दोष देतो. कारण त्यांनी आपली जबाबदारी ओळखली नाही. वडिलांचे

चुकत असता त्यांना हे सांगणे गैर आहे, असे मला वाटत नाही. तुमच्यावर आता

ही जबाबदारी आहे. त्याचप्रमाणे स्त्रियांवर पण आहे. मी बोलतो ते केवळ

पुरूषांकरिताच नव्हे. स्त्रियांनीसुद्धा याची जबाबदारी ओळखली पाहिजे. याचा

तुम्ही विचार केला पाहिजे. तुम्ही नोकरीवर जाल, मला वाटते तुम्हापैकी बहुतेक

कारकूनच होतील तर काही तरी ५०-६० रुपये पगार तुम्हास मिळेल आणि त्यात.

तुम्हाला चौदा पोरे झाली तर त्या पोरांचे काय होणार ? त्यांची जबाबदारी

समाजावर टाकणार ? याचा तुम्ही चांगला विचार करा. तुम्ही संन्यास

घ्यावयास तयार नसाल पण त्यातूनही तो कोणी घेतला तर फार चांगले ! (हंशा)

हसू नका. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. मला पाच मुले झाली. त्यापैकी

चार मेली. याबद्दल आता मला वाईट वाटत नाही तर उलट आनंदच

वाटतो. ही मुले जर जगली असती तर त्यांचे शिक्षण, खाणे, राहणे यांचा बोजा

माझ्यावर पडला असता व ते मला फार त्रासाचे झाले असते. मला एकच मुलगा

आहे. माझ्यावर त्याची फार जबाबदारी आहे. त्याच्या एकशतांश जरी

जबाबदारी तुम्ही आपल्या मुलांबद्दल दाखविलीत तर फार उत्तम. ही समाजाच्या

कल्याणाची गोष्ट आहे. तुम्हाला पाच सहा मुले झाली तर त्यांना शिक्षण कसे

देणार, त्यांची इतर काळजी कशी घेणार ? मला वाटते ही चढती भाजणीच्या

ऐवजी उतरती भाजणी आहे. तेव्हा स्त्री-पुरूषांचे पशुप्रमाणे जीवन घालविणे

माणुसकीला सोडून आहे, या गोष्टीचा तुम्ही अवश्य विचार करा. |

७७०७