१५०
स्वातंत्र्य, माणुसकी, [समान ] [हक्क ] [मिळतील ]
तेच स्वराज्य
ता. ६ जानेवारी १९३९ रोजी [महाड ] [येथे ] [सात ] [हजार ] [शेतकऱ्यांच्या ] पुढेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर [यांचे ] [निर्भिड ] [व ] [मननीय ] [भाषण ] [झाले. ] ते आपल्याही भाषणात म्हणाले,
प्रिय भगिनींनो व बंधुंनो,
मी नगर, खानदेश, निजामचे राज्य या बाजूला दौऱ्यावर गेलो होतो, नुकताच परत आलो. त्रास झाल्यामुळे चार दिवस विश्रांती घेण्याचा विचार केलाई होता. तरीसुद्धा माझ्यावर या सभेत बोलण्याची पाळी आलीच. मी काही फार वेळ बोलणार नाही, १०-१२ मिनिटे बोलेन. आज मी फक्त तीन मुद्यांवर बोलणार आहे. सात प्रांतात काँग्रेसचे राज्य आहे. बंगाल, पंजाब या प्रांतात इतर पक्षाला नेस्तनाबूद करून कांग्रेसचे राज्य स्थापण्याचा प्रयत्न चालू आहे. तीन-चतुर्थाश भागावर काँग्रेसचे राज्य आहे.
माझे एक मित्र थड्टेने म्हणाले, ” काँग्रेसने अधिकारसूत्रे घेऊन आज १८ महिने झाले. एखादी बाई १८ महिन्यात दोन वेळा बाळंत झाली असती. पण ही बाई अजून गरोदरही राहिली नाही “ हे अगदी बरोबर आहे. या काळातील जनतेच्या सुखासमाधानाच्या गोष्टींची कल्पना देणे गैर होणार नाही.
पहिला महत्त्वाचा प्रश्न हिंदू-मुसलमानांच्या ऐक्याचा प्रश्न आहे. स्वतंत्र मजूर पक्षाच्या सभेत हा प्रश्न निघत नाही. आपण फक्त पोटाचा प्रश्न विचारात घेतो. आधी पोटोबा मग विठोबा, असे आपण वागतो. परंतु इतर प्रश्नांचा उद्भव झाला की पोटाचा प्रश्नही बाजूला पडतो.
या देशात मुसलमान ८-९ कोटी आहेत. हे लोक मजुरी करणारे किंवा गुलाम नव्हेत. महाराष्ट्र सोडून हिंदुस्थानाच्या इतर भागावर औरंगजेब, अकबर वगैरे मुसलमान राजांची सत्ता होती. हिंदुस्थानच्या तीन-चतुर्थाश भागावर मुसलमानांची सत्ता होती. मुसलमानांची महत्त्वाकांक्षा राज्यसत्ता हस्तगत करण्याची आहे. हिंदुस्थानातील ९ कोटी मुसलमानांशीच आपला संबंध आहे, असे कोणी समजू नये. हिंदुस्थानाबाहेरील अफगाणिस्तान, इराक, पर्शिया,
जनता : २१ जानेवारी १९३९.