स्वातंत्र्य माणुसकी . . ... . तेच स्वराज्य २३९
तुकस्तान, इजिप्त येथे मुसलमानी सता असून वेळ प्रसंगी ती त्याच्या पाठीशी उभी आहे. मुसलमान म्हणतात; ' पुन्हा एकदा पानिपत होऊ द्या ' तेव्हा
हिंदू-मुसलमानात एकी होणे जरुर आहे. राजसत्ता ज्या काँग्रेसच्या हाती आहे
तिच्यावर ही सारी जबाबदारी आहे, आमच्यावर नाही! हिंदू-मुसलमान लढ्याबद्दल काँग्रेसने काय केले ? जाणूनबुजून काही केले नाही [! ]
गेल्या पाच-सात दिवसात मुस्लिम लीगची सभा पाटणा येथे झाली. त्यातील भाषणांचा ध्वनी लक्षात घ्या. मुसलमान समाजाची घोषणा हिंदूंविरूद्ध सत्याग्रह करण्याची आहे ! पण हा मुसलमानांचा सत्याग्रह म्हणजे गांधींचा सत्याग्रह नव्हे! ' हिंदुस्थान तोडून द्या' हे मुसलमान बहुजन समाजाचे मागणे ` नाही. मुसलमानांचा दिवाण लीगचा असावा, असे त्यांचे म्हणणे आहे. काँग्रेसने काही प्रांतात मुसलमान दिवाण घेतले आहेत. मग मुंबईतच लीगचा मनुष्य का घेऊ नये ? नुरी ऐवजी देहलवीला का घेऊ नये ? आज ना. नुरी ५०० रुपये घेत आहेत ते सर देहलवी यांनी घेतले असते, यात काय बिघडले असते समजत नाही! पुन्हा पानिपत करावयाचे आहे काय ?
दुसरा प्रश्न साम्राज्यशाहीस हाकून लावणे हा आहे. इंग्रजांचे साम्राज्य गेले तरी येथील गुजर, सावकार, खोत, गिरणीमालक जाणार नाहीत. ते तुमच्या रक्ताचे शोषण करणारच ! साम्राज्यशाही जावी अशी माझीही इच्छा आहे पण काँग्रेस काय करते ? मध्यवर्ती सरकार (फेडरेशन) अत्यंत किळसवाणे आहे. त्यात लुटारू, राजेरजवाड्यांच्या हातात आमची मानगूट देण्याचा ब्रिटीश सरकारचा प्रयत्न आहे. काँग्रेसच्या हाती सत्ता आहे. त्यामुळे हे नवे संकट टळू शकेल. पण काँग्रेस काय उपाययोजना करू इच्छिते ? इंग्रज सरकार हे फेडरेशन आमच्या माथी मारणार ! याला काँग्रेस पुढारी काय उपाय करणार ?
साम्राज्याचे कट्टे शत्रू काँग्रेसवाले फेडरेशनच्या विरूद्ध आहेत, अशी माझी मुळीच खात्री होत नाही ! एक मोठे कांग्रेस भक्त हवां खाण्याकरिता विलायतेस गेले होते. त्यांना कसला रोग झाला होता, मला माहित नाही ! या कॉंग्रेसच्या राजकारणातील बड्या झबूने इंग्रजाला आश्वासन दिले की, आम्ही फेडरेशनविसूद्ध कितीही ओरडलो. तरी ते आम्ही स्वीकारू. दे. भ सुभाषबाबूंची फेडरेशनविरूद्ध घोषणा काँग्रेसपक्षाच्या मुखपत्रातून-गायमुखाचून म्हणा वाटले तर- जाहीर झाली
होती. दुसऱ्या बाजूला सत्यमूति यांची पत्रक जा हीर केले की. ' सुभाषबाबूंना