डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे २४०
नाही. सत्यमूर्तिच्या या लिहिण्याचा काँग्रेस या विषयावर बोलण्याचा अधिकार
असे पुढाऱ्यांपैकी कोणी निषेध केला नाही ! यावरून कोठेतरी पाणी मुरते आहे,
संवाद झाला तो असा :- दिसते ! व्हाईसरॉयबरोबर एका गृहस्थाचा
गुहस्थ : काँग्रेस फेडरेशन स्वीकारणार नाही.
व्हाईसरॉय : मग काय करणार ? तुम्ही कशावरून म्हणता ?
गृहस्थ : सुभाषबाबूंच्या धोरणावरून.
व्हाईसरॉय : सुभाषबाबूंची घोषणा आम्ही ऐकली आहे. पण तुमचा
गांधी कुठे काय बोलतोय ? गांधींनी का मौन धरले आहे ?
महात्मा गांधींच्या या मुग्धतेत काहीतरी पाणी मुरत आहे. गांधी हिंदुस्थानला साम्राज्यशाहीचे गुलाम बनविणार आहे !
तिसरा प्रश्न आम्हाला स्वराज्य पाहिजे ते आमच्या स्वातंत्र्यासाठी पाहिजे ! सुखासाठी पाहिजे ! आम्हाला देशात पोटभर अन्न मिळत नाही, घर नाही, सुखसंपत्ती नाही ! ज्या राज्यात स्वातंत्र्य, माणुसकी वगैरे समान हक्क
आम्हास मिळतील तेच स्वराज्य !
आमच्याकरिता काँग्रेसने काय केले ? निवडणुकीपूर्वी शिक्षण देऊ, शेतसारा कमी करू वगैरे आश्वासने दिली होती. पण त्याचे आता काय ? मुंबई इलाख्यात असेंब्लीत काँग्रेसचे बहुमत आहे. मग हाती सत्ता नाही, असे कसे
म्हणता येईल ? पण काँग्रेसला तुमच्याकरिता काहीच करावयाचे नाही ! काँग्रेसचे स्वातंत्र्य कोठे आहे ? तुमच्या महाडात नुकतेच मुख्यप्रधान ना. बाळासाहेब खेर येऊन गेले. पण त्यांनी तुमच्याकरिता काही सांगितले का? नाही! कसे सांगणार ? त्यांना गांधींची आणि वल्लभभाईंची भीती वाटते. सध्या आपल्यावर गुजरात्यांचे राज्य आहे. वरिष्ठ सरकारकडून आलेल्या तीन कोटी जादा रकमेपैकी १ कोटी ९३ लक्ष म्हणजे जवळजवळ २ कोटी रुपये गुजरात प्रांतावर खर्ची पडले. मुंबई इलाख्याच्या तीन भागात महाराष्ट्र दरिद्री आहे. तेव्हा हे तीन कोटी रुपये गरीब महाराष्ट्राकरता खर्च व्हावयास पाहिजे होते. परंतु सर्वात श्रीमंत अशा गुजरात प्रांतावरच ते खर्च करण्यात आले ! रत्नागिरी, नगर वगैरे दुष्काळी जिल्ह्यांना त्याचा फार उपयोग झाला असता ! पण सध्या आपल्यावर गुजरात राज्य करीत आहे ! तीन गुजराती दिवाण दळतात आणि बाकीचे पीठ भरून भाकऱ्या भाजून गुजरातेत पाठवितात ! हे सारे दिवाण वल्लभभाईच्या दारची कुत्री आहेत !