ः
| १५१
समता सैनिक दलाचा सैनिक
निर्भय योद्धाच म्हटला पाहिजे
स्वतंत्र मजूर पक्षाच्या व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्पृश्यांच्या
वाहून आहे, त्या सर्वागीण उन्नतीच्या कार्याला, ज्या सैनिकांनी आजन्म घेतले
यांच्या मुंबईतील समता सैनिक दलाची वार्षिक परेड व पाहाणी डॉ. बाबासाहेब नेतृत्वाखाली, गेल्या रविवारी दिनांक ८ जानेवारी १९३९ ला सकाळी परळ येथील
।
कामगार मैदानावर झाली. मुंबईमधील निरनिराळ्या मोहल्ल्यातून, पहाड्यातून आणि वार्डातून समता सैनिक दलाची पथके आपल्या कॅप्टनसह सकाळी ६-३० वाजल्यापासून कामगार मैदानावर जमत होती. दलाचे कर्तृत्ववान जी. ओ. सी. श्री. रामजी धयाळकर यांनी सर्व दलांना शिस्तीने मैदानावर उभे करुन परेडची प्राथमिक तालीम घेतली. बँडच्या सुस्वर वाद्यात हा परेडचा कार्यक्रम उत्तम
झाला.
बरोबर १० वाजता डॉ. आंबेडकर आपल्या सहकाऱ्यांसह मैदानावर येताच. सैनिकांशिवाय इतर मंडळींनी त्यांचे टाळ्यांच्या गजरात जंगी स्वागत केले. समता. सैनिकांनी मिलीटरी थाटात त्यांना सलामी दिली आणि नंतर बॅडच्या मधूर वादनाने त्यांचे स्वागत करण्यात आले. हा प्राथमिक स्वागत समारंभ संपल्यावर, डॉ. बावासाहेब आंबेडकर, स्वतंत्र मजूर पक्षाचे सेक्रेटरी डी. व्ही. प्रधान व दलाचे जी. ओ. सी. धयाळकर यांनी समता सैनिक दलाची पाहाणीं केली. यावेळचा एकंदर देखावा लष्करी थाटाचा आणि अंगात एकप्रकारची वीरश्री उत्पन्न करणारा असा होता. प्रत्येक सैनिकाची टापटीप, नीटनेटके
कपडे, शिस्त वगैरे वाखाणण्यासारखी होती.
दलाची पाहाणी झाल्यावर वीर फोटो आर्ट स्टुडिओच्याद्वारे दलाचे व डॉ. आंबेडकरांसह पुढारी मंडळीचे निरनिराळे फोटो घेण्यात आले. या
जनरल परेडकरिता निदान २,५०० समता सैनिक व इतर जनता २०,००० पर्यंत
जमली होती. हा सर्व कार्यक्रम आटोपल्यानंतर सर्व सैनिकांना उद्देशून
डॉ. आंबेडकरांना भाषण करण्याची विनंती स्वतंत्र मजूर पक्षाचे सेक्रेटरी
जनता : १४ जानेवारी १९३९.
३,