समता सैनिक दलाचा सैनिक . . . . म्हटला पाहिजे २४३
श्री. डी. व्ही. प्रधान यांनी करताना सांगितले की, “ आज दलामध्ये युनिफार्म
घातलेले फक्त २,५०० सैनिक आहेत. युनिफार्मशिवाय तितकेच इतर सैनिक
आहेत. आजच्या परिस्थितीत पाच हजार समता सैनिक दलांची संख्या मुंबईत
आहे. माझी खात्री आहे की, ही संख्या दुप्पटीने वाढून ती १०,००० पर्यंत पुढील
वर्षी झालीच पाहिजे. तसेच समता सैनिक दलाच्या शाखा फक्त मुंबईतच नसून
त्यांचा प्रसार सी. पी. मध्यप्रांतादी निरनिराळ्या प्रांतात सुरु आहे. लवकरच
अखिल हिंदुस्थानामध्ये स्वतंत्र मजूर पक्षाच्या झेंड्याखाली ५०,००० सैनिक तयार
{झाल्याचे दृश्य दिसेल. प्रत्येक सैनिकानी स्वतंत्र मजूर पक्षाच्या कार्याकरिता
यापुढे विशेष जातीने झटले पाहिजे. “ श्री. प्रधान .यांच्या प्रास्ताविक
। भाषणानंतर डॉक्टरसाहेब भाषण करावयास उभे राहिले. ते आपल्या भाषणात
म्हणाले,
। समता सैनिक दलाच्या आजच्या वार्षिक जनरल परेडच्या निमित्ताने
| मुंबईतील सर्व सैनिक इतक्या जमावाने जमल्याबद्दल मला आनंद होत
, आहे. तसेच आज येथे त्यांनी एकत्र येऊन आपल्या संघटनेचे, शिस्तीचे व
, स्वार्थत्यागाचे दाखविलेले प्रदर्शन बहुजन. समाजाला आदर्श म्हणून गणले
; जाईल. स्वतःच्या पैशाने प्रत्येकाने आपला युनिफॉर्म करून आपल्या पक्षाच्या , कार्याविषयी दाखविलेली कळकळ खरोखरच अभिनंदनीय आहे. हेदलमीव
` माझ्या सहकारी मित्रमंडळींच्या बडेजावाकरिता आहे, असा काहींचा समज आहे,
. परंतु या दलाची ज्याला पूर्वपिठीका ठाऊक आहे त्याला या दलाची स्थापना
करण्यात किती उदात्त आणि उज्ज्वल ध्येय पुढे ठेविलेले आहे, याची खात्रीने
कल्पना येईल.
१९२६-२७ च्या सुमारास या दलाची स्थापना करण्याची मुहूर्तमेढ महाड
येथील चवदार तळ्याच्या सत्याग्रहाने करण्यात आली. त्यावेळी महाडच्या
सत्याग्रहाचे कार्य निर्विघ्नपणे आणि यशस्वीरीतीने पार पाडण्यासाठी अशा
संघटित दलाची फारच आवश्यकता होती. आम्ही स्थापन केलेल्या या समता
सैनिक दलाची पूर्वपिठीका पाहता व एकदर परिस्थितीचा विचार करता दलाची
स्थापना मी माझ्या नावाकरिता, जयजयकाराकरिता किवा बुवाबाजीच्या
स्वरूपाच्या कार्याकरिता केलेली नाही. याला सरळ व रोखठोक उत्तर महाड
तलावाच्या लढ्याने सहज मिळण्यासारखे आहे. हिंदुस्थानात जे अनेक धर्मीय
समाज आहेत त्यात हिंदू समाजात अस्पृश्यांचा समावेश होत असल्यामुळे आणि
या हिंदू समाजातील स्पृश्य बांधवांकडून अस्पृश्य मानलेल्या समाज बांधवांवर,
होणाऱ्या अन्याय, जोर-जुलूम, विषमतेची शिकवण व वागणूक वगैरे अनिष्ट आणि
वि (वाय) ४१०-१८ अ