आणि भाषणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन २४४
स्थापना करण्यात | घातुक प्रकारांना आळा बसविण्याकरिता या दलाची प्रामुख्याने
आली आहे. ज्या समाजात माणुसकीने जगता येत नाही, नैसर्गिक हक्कांचा जिथे समतेने उपभोग घेता येत नाही, ज्या धर्मावर विषमतेचा कीट चढला आहे तो धर्म झुगारून देऊन खरी माणुसकी जाणणारा धर्म निर्माण करण्याकरिता जे॥ कार्य करावे लागत आहे, त्या पवित्र आणि उज्ज्वल कार्यासाठी या दलाची स्थापना झालेली आहे. या कार्याची मुहूर्तमेढ महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाने करून हा सत्याग्रहाचा लढा विजयी केलेला आहे. अशाच तऱहेने ज्या ज्या ठिकाणी सार्वत्रिक विहिरी आहेत, तळी आहेत, नळ आहेत तेथे असेच समान हक्काचे लढे लढवून आपले कार्य करावयाचे आहे. महाड तळ्याचा सत्याग्रह आपणास पिण्यास पाणी मुळीच मिळत नव्हते या भावनेने केला नव्हता. या तळ्याच्या पाण्यावाचून आपले अडले नव्हते किंवा आपण तडफडून
मरत नव्हतो. हा लढा पिण्याच्या पाण्यासाठी नव्हता; तर तेथील पाणी सर्व जातींच्या, धर्माच्या आणि पंथांच्या लोकांना समानतेने पिण्यास मिळावे याच
हक्कासाठी हा लढा लढविला गेला. तीच गोष्ट नाशिकच्या काळाराम मंदीर प्रवेशाच्या सत्याग्रहाची. केवळ देवाच्या दर्शनासाठी आम्ही भुकेलेले
नव्हतो. गेल्या दोन हजार वर्षात हिंदूंच्या देवांचे अस्पृश्य बांधवांना दर्शन झाले
नव्हते. म्हणून अस्पृश्य समाजाचे अडले नव्हते. नाशिकच्या मंदिर प्रवेशाचा
लढा हा केवळ आपल्या हिंदू समाजातील समानतेच्या हक्कांचे संरक्षण
करण्याकरिता होता. त्या सत्याग्रहाच्या लढ्यात लोकांना ज्या पीडा झाल्या होत्या, जे अनेक दुखःमय त्रास सोसावे लागले ते केवळ आपण माणसे आहोत आणि इतर माणसांप्रमाणे आपणालाही मंदिरात प्रवेश करण्याचा हकक आहे हे प्रस्थापित करण्याकरताच सोसले होते. आपण माणसासारखी माणसे असून आमच्या या मंदिरातील प्रवेशामुळे ती हिंदू देवालये अपवित्र कशी होतात हेच कळत नाही आणि हा स्पृश्य हिंदुंनी आपणावर लादलेला शिवाशिवीचा घाणेरडा कलंक धुवून टाकण्याकरिता, आम्ही प्रत्यक्ष माणसे असून कोणत्याही दृष्टीने अपवित्र नाही हे दाखविण्याकरिताच हा काळाराम मंदीर प्रवेशाचा लढा लढविणे भाग पडले होते.
वरील प्रकारचे मोठे उज्ज्वल तत्त्वांचे लढे लढविण्याकरिताच आपल्या समता सैनिक दलाची स्थापना करण्यात आली आणि हीच खरी आपल्या दलाची। पूर्वपिठीका आहे. यावरून दिसून येते की या दलाची उमारणी व्यक्तिवाचक नाही. या देशातील हिंदी समाजात खरी समता प्रस्थापित करण्याकरिताच हे समता सैनिक दल स्थापन झाले आहे. .