८-१-१९३९ समता सैनिक दलाचा सैनिक निर्भय योद्धाच म्हटला पाहिजे - Page 283

समता सैनिक दलाचा सैनिक . . . . म्हटला पाहिजे २४५

समता सैनिक दलाचा सैनिक म्हणजे समाजसेवेसाठी तळहातावर शीर घेऊन

लढण्यासाठी सज्ज झालेला निर्भय योद्धाच म्हटला पाहिजे. माणुसकीसाठी

समतेचे उज्ज्वल तत्त्व अंतःकरणात तेवत ठेवून आपल्या कार्याची त्याने पूर्तता

केली पाहिजे, यासाठी सर्वांनी शपथा घेऊन कोणत्याही प्रकारचा जातीभेद

मानणार नाही, महार, मांग, भंगी वगैरे उच्चनीचतेचे भेद मानणार नाही, मी माणूस

आहे, सर्वांना माणुसकीने वागवीन आणि विषमतेचे जहरी बीज समाजातून नाहीसे

करीन वगैरे प्रकारचा बाणा शपथपूर्वक बाळगला पाहिजे. असा बाणा

बाळगणारा हाच खरा समता सैनिक दलाचा सैनिक ठरला पाहिजे. या एकदर

| परिस्थितीचा विचार करता आपले दल स्वातंत्र्याच्या युद्धात मागासलेल्या वर्गाच्या

|

। आघाडीची एक लढवय्यी तुकडी आहे, हे पूर्णपणे लक्षात ठेवा. तुम्ही आपल्या t

प्रत्येक कृतीने देशाचे आदर्श सैनिक बनले पाहिजे. तुमच्याकडे पाहताच सैनिक

: दलाचा एक उत्कृष्ट नमुना या दृष्टीने तुमची जगात कीर्ती गाजली

पाहिजे. सद्गुण, शिस्त आणि संघटना यांच्यामुळे आपले दल पोलादी बनले

' पाहिजे. शुद्ध वर्तन आणि समतेचा भाव मनात धरल्यावर, आपल्यात जी एक

' म्हण आहे की ' तव्याचा जाय बुरसा मग तो दिसे आरसा ' तशी परिस्थिती उत्पन्न

: झाली पाहिजे. अनेक प्रकारच्या परिस्थितीमुळे तव्यातील बुरसा वाढला

आहे. त्यामुळे तवा काळाकुट्ट आणि घाणेरडा दिसत आहे. परंतु तोच योग्य ` रीतीने मेहनत घेऊन साफसूफ केला, त्याच्यावरील सर्व घाण कायमची ` घालविण्याचा प्रयत्न केला तर खात्रीने त्यात यश मिळून तो शेवटी आरशासारखा

स्वच्छ होतो. तसेच परिस्थितीने आपल्या समाजात काही अनिष्ट चालीरिती

रुढ झाल्या असल्यास, दारूचे व्यसन लागले असल्यास, पान तंबाखू खाण्यावारी :- आपण वेळेचा, शरीराचा दुरुपयोग करीत असल्यास, आपण योग्य वेळी सावध ` होऊन निर्व्यसनी बनले पाहिजे. अशाप्रकारे सर्व प्रकारच्या अनिष्ट प्रसंगांवर,

चालीरीतींवर नियंत्रण ठेवल्यास आपल्यावर कोणीही कसल्याही प्रकारचे आरोप

करणार नाही. कोणत्याही प्रकारची पीडा देण्याचे धैर्य कुणी करणार

नाही. अशा उज्ज्वल ध्येयाने आपण कार्य केल्यावर कुणी आपणावर निष्कारण

टीका केली तर हाथी चलता है और कुत्ता भोंकता है याप्रमाणे ठरेल. प्रामाणिकपणे

कार्स करीत राहिल्यावर जाणूनबुजून खोडसाळपणाने टीका करणारांची पर्वा

बाळगण्यात मुळीच हशील नाही.

अशा रीतीने समता सैनिक दलाचे कार्य दिवसेंदिवस यशस्वी होत असलेले

पाहून मला धन्यता वाटते. परंतु आपल्या दलाचे हे लोकोपयुक्त कार्य पाहून

आपल्या विरोधकांना व टीकाकारांना पोटदुखी उत्पन्न झाली आहे. हल्ली मुंबई

येथे काँग्रेस सरकारकडून ता. ७ नोव्हेंबर १९३८ रोजी झालेल्या एक दिवसाच्या

सार्वत्रिक संपात पोलीसांकडून झालेल्या गोळीबारामुळे झालेल्या अत्याचारासंबंधी

चौकशीचे काम सुरू आहे. ही चौकशी सुरू असता तिच्या कामकाजावर टीका

\