आणि भाषणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन २४६
सैनिकांनी आजपर्यंत करण्याचा माझा मुळीच उद्देश नाही. परंतु ज्या
समाजसेवेचे उज्ज्वल कार्य केले आहे त्याबद्दल प्रमुख पुढाऱ्यांपैकी मुंबईचे मुख्य
पुढारी वल्लभभाई पटेल यांनी प्रधान श्री. बाळासाहेब खेर व काँग्रेसचे एक बडे श्री.
प्रसंशोदगार काढलेले आहेत.
मुंबई प्रधान मंडळाच्या पगारासंबंधी मी जे भाषण केले हाते त्याला उत्तर देताना ना. खेर म्हणाले होते की, स्वतंत्र मजूर पक्षाच्या कार्याला मदत करणाऱ्या समता सैनिक दलाच्या स्वयंसेवकांनी स्वार्थत्यागाने, स्वाभिमानाने आणि शिस्तीच्या बळावर बिना मोबदला केलेले कार्य मला ठाऊक आहे आणि हे स्वयंसेवक इतक्या उज्ज्वल प्रकारचा स्वार्थत्याग जर करू शकतात तर आम्ही असेंब्लीच्या मंत्र्यांनी केवळ स्वार्थत्यागाने दरमहा ५०० रुपये पगार पत्करण्यास मुळीच हरकत नाही. तीच गोष्ट श्री. वल्लभभाई पटेल यांच्या उद्गारांवरून
सिद्ध होईल.
गेल्या प्रांतिक असेंब्लीच्या निवडणुकी झाल्यावर पुण्यात शनिवार वाङ्यासमोर स्वयंसेवकांच्या कार्यासंबंधी भाषण करताना श्री. वल्लभभाई म्हणाले की, ' संघटना, शिस्त, कार्याची कळकळ आणि ते यशस्वी करून दाखविण्याची धमक
या दृष्टीने विचार करता स्वतंत्र मजूर पक्षाचेच स्वयंसेवक काँग्रेसच्या स्वयंसेवकांपेक्षा सरस ठरतील आणि हे त्यांच्या अंगी असलेले विशेष गुण इतर स्वयंसेवकांनी अवश्य आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे" वगैरे. आपल्या समता सैनिक दलाच्या सैनिकात शेकडा ९० प्रमाणात महार
तरुणांचा भरणा आहे. या देशात ब्रिटिश सरकारचा अंमल सुरू झाल्यापासूनचा इतिहास अवलोकन केल्यास रयतेचा पैसा तालुक्याच्या तिजोरीत नेऊन भरणारे
महार लोक आहेत. गेल्या १५०-२०० वर्षात या बाबतीत एकाही महाराने
अप्रामाणिकपणा दाखविल्याचा पुरावा नाही. हजारो रुपये रात्रीबेरात्री व उन्हातान्हातून प्रवास करून हा रयतेचा पैसा महारांनी सरकारी तिजोरीत भरून आपला प्रामाणिकपणा जगाच्या निदर्शनास आणला आहे. अशा एकंदर सर्व गोष्टींचा विचार केल्यावर मुंबई येथे कामगार संप गोळीबार चौकशी कमिटीपुढे महारांवर जे अप्रामाणिकपणाचे व गैरशिस्तीचे आरोप करण्यात येत आहेत ते. कितपत खरे असतील याची शहानिशा करण्याची वेळ आल्याशिवाय राहाणार नाही. गरिबीने गांजलेल्या या समाजातील माणूस हाती हजारो रुपये असताना कोणत्याही प्रकारची अफरातफर करू शकत नाही, त्या या महार समाजाचे चारित्र्य किती उज्ज्वल असेल याची मीच स्तुती करायला पाहिजे असे नाही. जनता या सर्व गोष्टींचा विचार करण्यास समर्थ आहे. तशात समता सैनिक दलात काम करणारे काही स्वयंसेवक मिलीटरी खात्यात नोकरी केलेले आहेत. त्यांना कायदा, शिस्त चांगली कळते. अशावेळी दलाच्या स्वयंसैवकांवर आरोप करणे मोठ्या धाडसाचे किंवा खोडसाळपणाचे कृत्यच समजले पाहिजे.