८-१-१९३९ समता सैनिक दलाचा सैनिक निर्भय योद्धाच म्हटला पाहिजे - Page 285

समता सैनिक दलाचा सैनिक . . . . म्हटला पाहिजे २४७

शेवटी मला प्रत्येक सैनिकाला सांगायचे आहे की सैनिक हा शब्द मोठा महत्त्वाचा आहे. आपण खात्रीने बाजारबुणगे नाहीत, हे सिद्ध करणारा हा शब्द आहे. आपले कार्य करीत असताना तुम्ही सर्वजण प्रत्यक्ष फलटणीतच आहात,

| ही भावना मनात बाळगली पाहिजे. सभेच्यावेळी जो अफाट जनसमुदाय जमतो

त्याचा योग्य बंदोबस्त ठेवताना आपण सैनिक आहोत ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. जनसमुदाय बाजारबुणग्याप्रमाणे वागेल, त्याच्या कृतीत आणि तुमच्या कार्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. यासाठी सैनिक म्हटला म्हणजे तो

शिस्तीचा शिलेदार. एखाद्या अधिकाऱ्याचा हुकूम चुकीचा वाटून त्याच्याविरुद्ध

कुरकुर किंवा प्रतिकार करून चालणार नाही. केवळ शिस्तीकरता वेळ प्रसंगी

सर्व प्रकारच्या प्रसंगांना धैर्याने तोंड देण्याचा आपला संकल्प यापुढेही उज्ज्वल :

समाजसेवेने पुरा करा, एवढेच तुम्हाला सांगावयाचे आहे.