संस्थानांची पुनर्घटना करून . . . . . करणे गरजेचे २४९
मी चळवळ्याही आहे आणि विद्यार्थीही आहे. शिक्षक हा वृत्तपत्रासारखा असतो आणि राजकीय पुढारी हा मतपत्रासारखा असतो. मला एकप्रकारच्या मतप्रचाराची ही संधी मिळाली आणि तीही मला आवडणाऱ्या विषयावर बोलण्याची
संधी मिळाली म्हणून या विषयावर बोलण्याच्या निमंत्रणाचा स्वीकार मी आनंदाने
केला. |
१९३५ ची जी संयुक्त राज्यघटना हिंदुस्थानावर लादली जाणार आहे, तिचे स्वरुप फार विचित्र आहे. हे हिंदी फेडरेशन राक्षसी स्वरुपाचे होणार आहे. अमेरिकेतील संयुक्त संस्थाने किंवा जर्मनी अथवा स्वित्झर्लंड अगर कॅनडा किंवा ऑस्ट्रेलिया यापैकी कोणत्याही राष्ट्रातील फेडरेशनशी हिंदुस्थानच्या संयुक्त संघटनेची तुलना केली तर असे दिसून येईल की हिंदुस्थानातील ही घटना ` खरोखरच आसुरी स्वरुपाची आहे. कायदे मंडळाची घटना घ्या, मंत्रीमंडळाचे ` स्वरुप पाहा, अथवा वरिष्ठ न्यायासनाची अधिकार परीक्षा करा, काहीही पाहिले तरी हिंदुस्थानातील या संयुक्त संघटनेचे एकंदर स्वरुप विचित्र आणि अपूर्व असेच दिसेल. (१) संयुक्त संघटनेचे घटक, (२) घटकांचे मध्यवर्ती सरकारशी संबंध आणि (३) राष्ट्रातील बहुजन समाजाचा संयुक्त संघटनेतील नागरिकत्वाचा संबंध यापैकी कोणत्याही दृष्टीने या आगामी घटनेचे परीक्षण केले तर ती दोषपूर्ण आणि टाकाऊ आहे, असेच दिसून येईल. या संयुक्त संघटनेला संयुक्त संघटना किंवा फेडरेशन हे नाव देण्याच्या अगोदर विभक्त संस्थानांचा गट किंवा कॉन्फिडरेशन हे नाव दिले तर ते अधिक शोभेल. या संघटनेत संयुक्ततेपेक्षा विभक्ततेचेच गुण अधिक आहेत. सबंध राष्ट्रातील सर्व नागरिकांना सर्वसामान्य नागरिकत्वाचे हक्क या घटनेने दिलेले नाहीत. अशी ही मूलतःच सदोष असलेली घटना काही दुरुस्ती केल्यास स्वीकारार्ह होईल, असे म्हणणारा
एक वर्ग आहे. त्या लोकांचे म्हणणे असे आहे की ही घटना स्वीकारल्यास
हळूहळू (१) हिंदी संस्थानात लोकशाही राज्यपद्धती सुरू होईल,
(२) हिंदुस्थानला जबाबदार राज्यपद्धतीचा लाभ होईल आणि (३) हिंदुस्थान देश एकछत्री होऊ शकेल, पण असे म्हणणाऱ्या लोकांनी १९३५ चा कायदाच नीट
वाचलेला दिसत नाही. या कायद्याचे अगदी कलम ६ (१) हे वाचले आणि त्याच्या पहिल्या परिशिष्टावर नजर टाकली तर असे दिसून येते की या घटनेने
सबंध हिंदुस्थान एकछत्री होऊ शकत नाही किंवा त्यात ऐक्यही निर्माण होऊ शकत
नाही. हिंदुस्थानातील ६५० संस्थानांपैकी ४९८ संस्थानांना फेडरेशनमध्ये सामील होण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. |