आंबेडकर लेखन आणि भाषणे डॉ. बाबासाहेब २५०
बाहेर वगळल्याने हिंदुस्थानचे ऐक्य घडून येते. या लहान संस्थानांना
आहे. या संस्थानांचे भवितव्य काय होणार, याचाही काय ? असा माझा प्रश्न
या नवीन घटनेने संस्थानातील | समाधानकारक खुलासा झाला पाहिजे.
एकतंत्री राज्यपद्धती नष्ट होईल, अशी अपेक्षा करणेही चुकीचे होईल. कारण या कायद्यानेच संस्थानिकांना असे स्पष्ट आश्वासन देण्यात आले आहे को त्यांच्या संस्थानातील अंतर्गत राज्यकारभारात कोणत्याही प्रकारची ढवळाढवळ करण्याचा अधिकार फेडरेशनला नाही. एवढ्यावरच न थांबता या घटनेने संस्थानातील एकतंत्री राज्यव्यवस्थेला खालसा मुलखातील लोकशाहीवर सासुरवास गाजविण्याची नवीनच सत्ता निर्माण करून दिलेली आहे. तसेच या घटनेने संपूर्ण जबाबदार राज्यपद्धतीचाही लाभ हिंदुस्थानास होणार नाही.
लष्करी संरक्षण आणि परराष्ट्र राजकारण ही खाती सरकारने आपल्याकडे राखून ठेविली आहेत.. अर्थात मध्यवर्ती सरकारात द्विदल राज्यपद्धती सुरू करण्याची ही घटना आहे. पण द्विदल राज्यपद्धतीने जबाबदार राज्यपद्धतीची कशी गळचेपी केली जाते, याचा अनुभव आपणा हिंदी लोकास नुकताच आलेला असता. मध्यवर्ती सरकारात तिला गोड फळे येतील, अशी अपेक्षा करणे हा शुद्ध वेडेपणाच नाही काय ? कोणत्याही दृष्टीने तुम्ही या
घटनेची छाननी केलीत तरी तिच्यात खऱ्या लोकोत्तर दायित्वाचा पूर्ण अभाव असल्याचे तुम्हाला आढळून येईल. ही घटना काही दुरुस्त्या केल्यास स्वीकारावी, असे मि. सत्यमूर्ती म्हणतात. पण मी म्हणतो की
श्री. सत्यमूर्तीनी सुचविलेल्या सर्व दुरुस्त्या त्या योजनेत घडून आल्या तरीही तिची त्याज्यता कमी होणार नाही. कारण या योजनेत मूलभूत दोष
आहेत. या योजनेने हिंदुस्थानला स्वराज्याचे ध्येय गाठता येणार नाही.
` हिंदुस्थानचे अंतिम राजकीय ध्येय कोणते ? काँग्रेस आता पूर्ण स्वातंत्र्यावरून
डोमिनिअन स्टेट्सकडे पुच्छप्रगती करीत आहे. पण माइया मते या फेडरेशनच्या
योजनेने डोमिनिअन स्टेट्सचा मार्गही बंद केला जाणार आहे आणि म्हणूनच
या घटना कायद्यात डोमिनिअन स्टेट्स या शब्द योजनेवर पूर्ण बहिष्कार
घालण्यात आल्याचे आपणास आढळून येइल. ही फेडरेशनची घटना
अपरिवर्तनीय स्वरूपाची आहे. खुद्द ब्रिटिश पार्लमेंटला सुद्धा संस्थानिकांच्या
संमतीविना ती बदलता येणार नाही किंवा ती बदलावयाची झाल्यास फेडरेशनच
नष्ट करावे लागेल. जबाबदार राज्यपद्धती हा डोमिनिअन स्टेट्सच्या मार्गावरील
पहिला टप्पा आहे पण या योजनेने राखीव खाती निर्माण करून हा रस्ता बंद : केला आहे. यापुढेही लष्कर आणि परराष्ट्र राजकारण ही खाती सोपीव केली