संस्थानात राहाणाऱ्या लोकांची . . . . जनावरांपेक्षा वेगळी नाही २६५
झाला. नंतर सायंकाळी ५ वाजता राजवाड्यापासून जंगी मिरवणूक निघून ती
सभेच्या मंडपापर्यंत आली. सभेसाठी भव्य मंडप व स्टेज तयार केला होता.
संस्थानातील सर्व बडी बडी स्त्री-पुरुष मंडळी सभेत मुद्दाम आली होती. . सुरूवातीस
स्वागतपर पद्ये व पोवाडे झाल्यानंतर सभेचे स्वागताध्यक्ष श्री. गायकवाड यांनी
| डॉ. बाबासाहेबांचे व जमलेल्या मंडळींचे स्वागत करून आपल्या समाजाने संघटित
| राहणे किती हिताचे व महत्त्वाचे आहे याचे वर्णन केले. शेवटी डॉ. बाबासाहेबांनी
| परिषदेचे अध्यक्षस्थान स्वीकारावे अशी विनंती केली. प्रचंड टाळ्यांच्या
कडकडाटात डॉ. बाबासाहेब स्थानापन्न झाले. सभेसाठी फलटण
| संस्थानातील व संस्थानाबाहेरील असा सुमारे दहाबारा हजार जमाव जमला होता.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात बोलण्यास
| उठले. ते म्हणाले,
मी फलटण संस्थानातील अस्पृश्य मानलेल्या लोकांच्या परिषदेसाठी जरी येथे _ आलो असलो तरी सर्वसाधारण जनतेचे कर्तव्य काय, आज जगात काय चालले
आहे इकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सर्वसाधारण जनता ही सध्या
लोकशाहीची भाषा बोलत असून संस्थानात व संस्थानाबाहेर लोकशाहीच्या
` तत्त्वावर सुधारणा मिळविण्याचे प्रयत्न करीत आहे. अशावेळी संस्थानिकांनीही ` आपला दृष्टिकोन बदलून प्रजेला जितके अधिक अधिकार देण्यासारखे असतील
_ तेवढे दिले पाहिजेत.
आजची संस्थाने ही मागच्या राज्यांची अवशेष आहेत. पूर्वीच्या काळी
` राजांना जर कोणती शिकवणूक मिळत असेल तर ती म्हणजे गो-आह्मण प्रतिपाल
` करणे एवढेच होय ! गो-ब्राह्मण प्रतिपाल हे त्यावेळच्या राजाचे मुख्य कर्तव्य
` समजले जात असे. गो-ब्राह्मण प्रतिपाल म्हणजे गाईंना चारा घालून ब्राह्मण
. जातीचे रक्षण केले म्हणजे राजाचे राजा म्हणून दुसरे कर्तव्यच शिल्लक राहिले
' नाही, असे समजण्यात येई. गो-ब्राह्मण प्रतिपालाखेरीज राजाने दुसरे काही न
केले तरी चालत असे. आज सर्व संस्थानात राहाणाऱ्या लोकांच्या परिस्थितीकडे
पाहिल्यास त्यांची स्थिती गोठ्यात कोंडलेल्या जनावरापिक्षा मोठी चांगली
नाही. याचा दोष जर कोणाकडे जाणार असलाच तर तो हिंदुधर्माच्या वरील
शिकवणुकीकडेच जाईल. चाणक्यनिती, मनुस्मृती वगैरे ग्रंथांचे अवलोकन केले
तर आपणास असे दिसून येईल की, त्यांनी राजाचे कर्तव्य म्हणजे खेड्यापाड्यातून
शाळा काढून लोकांना सुविद्य करणे, अगर लोकहिताच्या गोष्टी करणे याचा
कोठेच मागमूसही आढळणार नाही. या सर्व गोष्टी आपण इंग्रजांपासून शिकलो